आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, पुण्यात शेवटच्या दिवशी दिग्गज नेत्यांचा प्रचार, कुणाची असणार उपस्थिती ?

कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत या निवडणुकीत दिसून येत आहे.

आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, पुण्यात शेवटच्या दिवशी दिग्गज नेत्यांचा प्रचार, कुणाची असणार उपस्थिती ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 8:42 AM

अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या ( Pune Election ) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर कुठलाही प्रचार करता येणार नाहीये. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या मैदानात ताकदीने उतरत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे भाजपाच्या उमेदवारासाठी रोड शो ( Roadshow ) करणार आहे. तर कॉंग्रेस दिग्गज नेतेही आज रोड शो करणार आहे. ठिकठिकाणी कोपरा सभा देखील कॉंग्रेसकडून आयोजित करण्यात आल्या आहे. त्यामुळे अवघे काही तास प्रचारासाठी शिल्लक राहिल्याने कसबा आणि चिंचवड मतदारसंघात नेत्यांचा राबता असणार आहे.

कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत या निवडणुकीत दिसून येत आहे.

चिंचवडमध्ये यापूर्वी भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, यांच्यासह विविध नेत्यांनी तळ ठोकून निवडणूक हातात घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतिने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या वतिने जोरदार प्रचार सुरू आहे.

कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शरद पवार, अजित पवार, ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांच्यासह विविध नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे.

याशिवाय काही अपक्ष उमेदवार असल्याने त्यांनीही या निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाल्याने यामध्ये कोण बाजी मारणार याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार करण्याची वेळ आहे. त्यापूर्वी प्रचाराची रणधुमाळी सुरू असणार आहे. आज कसबा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो असणार आहे. त्यात कॉंग्रेसकडून कोपरा सभा आयोजित केल्या आहे.

कॉंग्रेसकडूनही दुपारीच भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही तास निवडणुकीत प्रचाराचा धुराळा कायम असणार असून सायंकाळी 6 वाजेनंतर धुरळा खाली बसेल.

26 फेब्रुवारीला दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी केली जात असून 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. खरंतर ही निवडणूक सुरुवातीपासूनच भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.