बाळासाहेबांच्या समाधीवर गुडघे टेकून माफी मागा; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

खासदार, आमदार यांनी आंदोलने केली, लाठ्या खाल्ल्या, पोलीस केसेस घेतल्या. वेड्यासारखं काम केलं, त्यांना तुम्ही गद्दार म्हणता? बाळासाहेब आमचं दैवत आहेत.

बाळासाहेबांच्या समाधीवर गुडघे टेकून माफी मागा; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 9:25 PM

मुंबई : शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी बंडखोरांवर चांगलाच निशाणा साधला. गद्दारीवरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Uddhav Thackarey) यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा (Dussehra Melava) घेतला. यावेळी शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. बाळासाहेबांच्या समाधीवर गुडघे टेकून माफी मागा, असे शिंदे यांनी ठाकरेंना सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

आम्ही गद्दार नाही, तुम्हीच गद्दार आहात. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला, तुम्ही पाप केलं. त्याबद्दल आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका. माफी मागा, मग आम्हाला बोला. शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी 40-40 वर्ष खस्ता खाल्ल्या.

हे सुद्धा वाचा

खासदार, आमदार यांनी आंदोलने केली, लाठ्या खाल्ल्या, पोलीस केसेस घेतल्या. वेड्यासारखं काम केलं, त्यांना तुम्ही गद्दार म्हणता? बाळासाहेब आमचं दैवत आहेत. त्या देवाचा अंश म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत होतो, म्हणून गप्प बसलो होतो.

अडीच वर्षापूर्वी सरकार बनत होतं. तेव्हा आमदार सांगत होते, ही आघाडी चुकीची आहे. ही आघाडी महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारी आहे. पण आम्ही आदेश पाळणारे. आम्ही आदेश पाळला, आम्ही अन्याय सहन केला.

सत्तेच्या हव्यासासाठी तुम्ही हिंदुत्वाला मुठमाती दिली

तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि विचार गुंडाळून टाकलं. तेव्हा आम्हाला भूमिका घ्यावी लागली. सर्व आमदार आमच्याकडे व्यथा मांडायचे. सत्तेच्या हव्यासाठी तुम्ही हिंदुत्वाला मुठमाती दिली. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. तुम्हाला त्या जागेवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का?, बोलण्याचा अधिकार तरी उरतो का?

वैयक्तीक स्वार्थासाठी राष्ट्रवादीकडे स्वाभिमान गहाण ठेवला

शिवसैनिकांनी रक्त सांडलं. पण तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रवादीकडे स्वाभिमान गहाण ठेवला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही राष्ट्रवादीच्या हातचे रिमोट झाला.

आम्ही जाहीर भूमिका घेतली

बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा जो हरामखोर असा उल्लेख केला, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वाईट वाटलं असेल. आम्ही जाहीर भूमिका घेतली. लपून छपून घेतली नाही.

तीन महिन्यांपासून फिरतोय. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिला भगिंनी भेटत आहे. स्वागत होत आहे. हा प्रेमाचा वर्षाव का होतोय. आम्ही बेईमानी केली असती तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला असता का? आम्ही जे केलं, ते शिवसेनेसाठी जनतेच्यासाठी.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.