Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला सुरुंग लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली मोठी जबाबदारी, सहसंपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्त्या जाहीर

आमदार आणि खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी पदाधिकारी फारसे शिंदे गटात गेले नव्हते, त्यामुळे शिंदे गटाची स्थानिक पातळीवरील परिस्थिति फारशी चांगली नव्हती.

ठाकरे गटाला सुरुंग लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली मोठी जबाबदारी, सहसंपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्त्या जाहीर
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 10:29 AM

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थातच शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये सुरुंग लावलेल्या अजय बोरस्ते यांच्यासह राजू लवटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडीस-तोड जबाबदारी दिली आहे. या नियुक्त्या देण्यापूर्वी भाऊसाहेब चौधरी यांना थेट शिवसेनेच्या सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते, त्यांच्याकडे नाशिकच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. त्यानंतर आता जिल्हाप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख पदाच्या नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या आहे. दहाहून अधिक नगरसेवक आणि पन्नासहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना ठाकरे गटातून शिंदे गटात घेऊन गेल्याने अजय बोरस्ते यांना जिल्हाप्रमुख पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. तर सहसंपर्कप्रमुख पदी राजू लवटे यांची नियुक्ती केली आहे. ठाकरे गटाला भिडण्यासाठी तोडीस तोड पदाधिकारी मिळाल्याने मुख्यमंत्री यांनी बोरस्ते आणि लवटे यांना बक्षीस दिल्याचे बोललं जात आहे.

ठाकरे गटाकडे विजय करंजकर, सुधाकर बडगूजर, दत्ता गायकवाड, वसंत गीते, सुनील बागूल असे फायरब्रॅंड नेते असल्याने त्यांना तोडीस तोड ठरू शकतील अशा अजय बोरस्ते, राजू लवटे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

आमदार आणि खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी पदाधिकारी फारसे शिंदे गटात गेले नव्हते, त्यामुळे शिंदे गटाची स्थानिक पातळीवरील परिस्थिति फारशी चांगली नव्हती.

हे सुद्धा वाचा

अजय बोरस्ते यांच्यासह भाऊसाहेब चौधरी हे शिंदे गटात दाखल झाल्याने बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटाची ताकद वाढली असून फायरब्रॅंड नेते मिळाले आहे.

अजय बोरस्ते यांना पालिकेच्या सभागृहापासून ते जाहीर सभेपर्यन्त भाषणं करण्याचा दांडगा अनुभव आहे, माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासापासून आरोपावर प्रतिवार करण्यासाठी बोरस्ते कायमच अग्रस्थानी राहिले आहे.

थेट संजय राऊत यांनाच शिंगावर घेणाऱ्या अजय बोरस्ते यांनाच जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी द्यावी यासाठी दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, सुहास कांदे यांनी फिल्डिंग लावली होती.

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.