LadKi Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेवासा येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

LadKi Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 4:47 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नेवासा विधानसभा मतदारसंघात आयोजीत प्रचारसभेत बोलत होते. आमचं सरकार देणारं आहे,  घेणारं नाही. घेणारे देवालाही सोडत नाहीत, मालक तसे तर त्यांचे आमदार कसे? असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलां.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

आमचं सरकार देणारं आहे घेणारं नाही.  घेणारे देवालाही सोडत नाहीत. मालक तसे तर त्यांचे आमदार कसे? लंघे तुम्ही आमदार झाल्यावर तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. नेवासा तालुका विकासाची चातकसारखी वाट बघतोय. त्यामुळे आपल्याला परिवर्तन करायचं आहे. यापूर्वीच्या आमदाराने शेतकरी आणि जनता सोडून स्वतःचा विकास केला. स्वतःचा केला तर म्हणा बस कर आणि आता घरी बस. मतदारसंघाचा विकास हवा असेल तर परिवर्तन तुम्हाला घडवावं लागेल. लंघेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. शनीमंदिर हे पवित्र स्थान आहे, ही जनता देवस्थानमधील घोटाळा खपवून घेणार नाही. या ठिकाणी कोणी स्वतःचे घर भरत असेल तर शनीदेव या नेवासा मतदरसंघात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते जमा झालेत. सरकार आल्यावर 1500 चे 2100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत. विरोधकांनी महालक्ष्मी योजना काढली, मात्र या बहिणी विरोधकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. आधी पाप केलं आणि आता म्हणता आम्ही देतो, तुम्ही काय देणार आमचं बहिणींना देऊन झालं. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी आहे. आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला आहे.  आपल्या राज्यात कोणीही उपाशी झोपता कामा नये, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महालक्ष्मी योजनेचं अश्वासन दिलं आहे. सरकार आलं तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ असं महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.