चार भावंड अनाथ झाली…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवली मदत…

गवारी कुटुंबाच्या दुखद घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी याच बेघर आणि अनाथ झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत केली आहे.

चार भावंड अनाथ झाली...मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवली मदत...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 7:23 PM

नाशिक : जिल्ह्यातील वंजारवाडी गावातील एक हृदयद्रावक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. ढगफुटीसदृश्य (Heavy Rain) पावसाने गवारी दाम्पत्याचा कोसळून जागीच मृत्यू (Death) झाला होता. त्यात तीन बहिणी आणि पाच वर्षांचा भाऊ वाचला होता. या घटनेनं पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात होती. घटनेत आई वडील दोघेही गेल्याने चारही भावंड अनाथ झाली होती. गवारी कुटुंबाच्या दुखद घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी याच बेघर आणि अनाथ झालेल्या कुटुंबाची भेट घेत त्यांना मदत केली आहे. गवारी यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. याशिवाय या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती यावेळी चिवटे यांनी दिली आहे.

वंजारवाडी या गावात 9 सप्टेंबर 2022 ला पहाटे मुसळधार पाऊस झाला होता. याचवेळी गवारी कुटुंब राहत असलेले घर कोसळले होते.

त्यात गवारी पती-पत्नी यांचा मृत्यू झाला होता, या दुर्घटनेत मात्र त्यांची चारही मुलं वाचली होती. त्यामुळे या घटनेनं नाशिक जिल्हा हादरला होता.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होती, त्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी केली जात होती.

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनीही भेट दिली होती. त्यावेळी आर्थिक मदत अनेकांनी या गवारी कुटुंबातील मुलांना केली होती.

शासनांच्या योजनेतून त्यांना शिक्षण आणि घर मिळवून द्यावे अशी मागणी नातेवाइकांनी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक आमदार यांच्याकडे केली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.