विक्रांतसाठी ज्या दलालाने पैसे खाल्ले, तुम्ही त्याची बाजू घेता, मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांचा खरपूस समाचार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेना काँग्रेसला मतदान करणार का, तर नक्की करणार. काँग्रेसला मतदान करणे पाप असेल, तर मेहबुबा मुफ्ती वेळी काय झाले होते. तुमच्या दलालावर आरोप होतोय. त्यांची बाजू तुम्ही घेताय. तुम्ही इतके खाली गेलात, अशी घणाघाती टोलेबाजी ठाकरे यांनी केली.

विक्रांतसाठी ज्या दलालाने पैसे खाल्ले, तुम्ही त्याची बाजू घेता, मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांचा खरपूस समाचार
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस.
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 5:25 PM

कोल्हापूरः विक्रांतसाठी ज्या दलालाने पैसे खाल्ले त्याची बाजू तुम्ही घेता, असे म्हणत मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा खरपूस समाचार घेतला. कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची आज ऑनलाइन सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, ना राज्याचा, ना भाषेचा अभिमान अशी माणसे तुमच्या बोकांडी बसवली. मुंबई महानगरपालिकेत एक ही काम टेंडरशिवाय दिले जात नाही. शिवसेना काँग्रेसला मतदान करणार का, तर नक्की करणार. काँग्रेसला मतदान करणे पाप असेल, तर मेहबुबा मुफ्ती वेळी काय झाले होते. तुमच्या दलालावर आरोप होतोय. त्यांची बाजू तुम्ही घेताय. तुम्ही इतके खाली गेलात? मोदींनी सर्वांना राशन दिले, पण ते शिजवायची की कच्चे खायचे. विक्रांतच्या पैशांनी तुमचे राशन तुम्ही भरले. एक तर आमचा हक्काचा जीएसटी दिला नाही आणि पेट्रोल कर का कमी करत नाही म्हणून विचारता? राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, तर पाठीत वार करणारी आमची अफजलखानची औलाद नाही, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

हा पंतप्रधान की सरपंच

मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचा भगवा खरा नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्ही झेंडा, नेता, रंग बदलला नाही. तुमच्या किती होर्डिंग्जवर अटलजी, अडवाणी आहेत. तुमच्या होर्डिंगवर आता एकच फोटो आहे. आम्हाला कळत नाही, हा देशाचा पंतप्रधान आहे की सरपंच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही यावेळी जोरदार टोलेबाजी केली. याला भाजपमधून कोण आणि काय उत्तर देणार हे पाहावे लागेल.

कडक शासन व्हावे

ब्रिगेडिअर सुधीर सावंत म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी 2013 साली आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी निधी गोळा केला. पण ते पैसे राज्यपालांना दिले नाहीत. हे प्रकरण सैनिकांमध्ये पसरले. विक्रांतशी सैनिकांची नाळ जोडली आहे. हा भावनिक विषय आहे. या पैशाचे ऑडिट झाले नाही. तो पैसा गायब आहे. सैनिकांच्या नावावर पैसा गोळा झाला म्हणून मी जबाब नोंदवलाय. याकडे राजकीयदृष्ट्या न पाहता कडक शासन व्हायला हवे. हा पैसा कुठे गेला, असा सवालही त्यांनी केला. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.