अय शंकरपाळ्या…. सोशल मीडियावर व्हायरल झालेले ‘ते’ भांडण अखेर मिटले

हे दोन चिमुकले नक्की कोण आहेत, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. त्यामुळे 'टीव्ही 9 मराठी'ने बुलडाण्यात जाऊन या दोघांना गाठले. | fighting Shankarpalya

अय शंकरपाळ्या.... सोशल मीडियावर व्हायरल झालेले 'ते' भांडण अखेर मिटले
शंकरपाळ्या आणि कारल्याची अखेर दिलजमाई.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 9:58 PM

बुलडाणा: सोशल मिडीयाच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही. जगभरात दररोज काही न काही गमतीजमती घडतात. अशीच एक गंम्मत बुलढाणा जिल्ह्यातील कळमेश्वर गावात घडली होती. (Children’s fighting Shankarpalya funny video on social Media)

त्याच झालं असं की शंकर आणि कार्तिक नावाचे मित्र खेळता खेळता अचानक भांडायला लागले. भांडता भांडता त्यांनी एकमेकांना नावावरून चीड पाडली. त्यातील कार्तिकने शंकरला ‘अय.. शंकरपाळ्या’ म्हणून चिडवलं. मग काय शंकरने फिल्मी स्टाईलमध्ये त्याला दम दिला आणि उपस्थित असलेल्या कुणीतरी तो व्हिडीओ काढून फेसबुक शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे भांडण महाराष्ट्रातील चर्चेच्या केंद्रस्थानी होते. या भांडणावरून फेसबुकवर अनेक विनोद आणि मिम्ससाही पाऊस पडला.

त्यानंतर हे दोन चिमुकले नक्की कोण आहेत, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. त्यामुळे ‘टीव्ही 9 मराठी’ने बुलडाण्यात जाऊन या दोघांना गाठले. हे दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील अंबाशीत राहतात. शंकर कोल्हे ( शंकर पाळ्या ) हा त्याचा मावस भाऊ असलेला कार्तिक भुसारी ( कारल्या ) यांच्याकडे गेलेला होता. यातील शंकर अगदी खोडकर मुलगा रोज कोणत्या न कोणत्या कारणास्तव तो भांडण करतो. मात्र, हे भांडण भलतेच गमतीशीर ठरले, असे कार्तिकच्या शेजाऱ्यांनी सांगितले.

या चिमुकल्याचं भांडण तरी का झालं?

शंकर आणि कार्तिक यांना भांडणाबद्दल विचारले असता त्यांनी आम्ही आता हे भांडण मिटवल्याचे सांगितले. शंकरने खेळता खेळता कार्तिकला ‘कारल्या’ म्हणून त्याला चिडवलं. यावरुन दोघांचे भांडण सुरू झाले. कार्तिकने मग शंकरला शंकरपाळ्या म्हणून चिडवलं. त्यामुळे हा सगळा गमतीशीर वाद रंगला.

संबंधित बातम्या:

VIDEO : कचरा वेचणाऱ्या मावशीने कुत्र्याचा जीव वाचवला, नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

14व्या वर्षी लग्न तर, 18व्या वर्षी मातृत्व, तरीही जिद्दीने पूर्ण केलं ‘IPS’ बनण्याचं स्वप्न!

Artificial intelligence ची कमाल, 25 वर्षांपूर्वी निधन झालेल्या गायकाच्या आवाजात नवे गाणे

(Children’s fighting Shankarpalya funny video on social Media)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....