आली का पंचाईत? चीनच्या तरुणीशी खेड्यातील मराठमोळ्या तरुणाचा विवाह; पण संवाद कसा साधणार?
आतापर्यंत आपल्या देशात अनेक तरुणांनी परदेशी तरुणींशी लग्न केलं आहे. संगमनेर तालुक्यातील एका मराठमोळ्या तरुणाने चीनच्या तरुणीशी पारंपारिक पद्धतीने विवाह केला. त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे.
संगमनेर : परदेशातील अनेक तरुणींनी भारतीय तरुणांशी लग्न केलं आहे. काही तरुणी त्यांचा देश सोडून भारतात राहायला आल्या आहेत. तर काही तरुण आपला देश सोडून तिथं राहायला गेले आहेत. महाराष्ट्रात (maharashtra viral news) अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर (sangamner news) तालुक्यात काल एक विवाह सोहळा झाला. त्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. कारण चीनच्या मुलीशी (china girl viral story in marathi) संगमनेर तालुक्यातील एका तरुणीने लग्न केलं आहे. काल ज्यावेळी लग्न सुरु होतं. त्यावेळी तरुणाचं मित्रमंडळ, पैपाहुणे, ग्रामस्थांनी अधिक गर्दी केली होती. त्या तरुणाने लग्न तर केलं आहे, तर त्या तरुणाचे घरचे त्या मुलीशी संवाद कसा साधणार अशी चर्चा काल मंडपात होती.
चीनची मुलगी झाली संगमनेरची सून
एखाद्या चित्रपटातील स्टोरी जशी असते, तशी स्टोरी संगमनेरमधील तरुणाची आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. चीनच्या मुलगी सून झाल्याने तरुणाचे नातेवाईकांना कुटुंबियांना सुध्दा आनंद झाला आहे. पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या विवाह सोहळ्याला अख्खं गाव उपस्थित होतं.
संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावात राहणाऱ्या तरुणाची स्टोरी प्रचंड व्हायरल झाली आहे. त्या तरुण राहुल हांडे असं आहे. तो चीनमध्ये गेल्या सात आठ वर्षापासून योगाचे धडे देत आहे. चीनमध्ये योग शिक्षक म्हणून काम करीत असताना त्याला यान छांग या मुलीशी मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे दोघांनी चीनमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यानंतर तरुण राहून हा यान छांग यांना घेऊन आपल्या मुळ गावी आला आहे. गावात आल्यानंतर त्याने नातेवाईकांच्या आणि ग्रामस्थांच्यासमोर सर्वांच्या उपस्थितीत पुन्हा लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. हळदीपासून सर्व विधी पार पडताना यान छांग अगदी भारावून गेली होती असं तिने सांगितलं आहे.
राहुल जेव्हा त्या तरुणीला घेऊन भारतात आला, त्यावेळी त्या तरुणीला निसर्ग बघून खूप आनंद झाला. पारंपारिक लग्नात पार पडलेले विधी त्यांनी कधीचं पाहिले नव्हते. चीनमध्ये पंधरा मिनिटात विवाह होतो, भारतात मात्र विधी संपायला पाच दिवस लागतात यान छांग यांनी सांगितलं.
लग्नविधी संपल्यानंतर राहूल यान छांग सोबत पुन्हा चीनला जाणार आहे. अजून काही वर्षे चीनमध्ये योगाचे प्रशिक्षण तो भारतात येणार आहे असं राहूल सांगितलं आहे. ग्रामीण भागातील तरूणाने चक्क चीनच्या मुलीशी लग्न केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.