चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली! अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना कोणत्या पक्षाचा पाठिंबा?
शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेल्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, याच ठाकरे गटासोबत युती केलेल्या पक्षाने कलाटे यांना पाठिंबा दिला आहे.
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची ( Mahavikas Aghadi ) डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे अपक्ष आमदार असलेले राहुल कलाटे ( Rahul Kalate ) यांना वंचित बहुजन आघाडीने ( VBA ) पाठिंबा दिला आहे, त्याबाबच पत्रक काढून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. आजचं वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार यांचीही डोकेदुखी वाढणार आहे.
खरंम्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
एकूणच राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, अजित पवार, सचिन अहिर या नेत्यांनी विनंती केली होती. मात्र, राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार न घेता आता वंचितचा पाठिंबा मिळवला आहे.
राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीने तो पाठिंबा पत्रक काढून दिला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आहे आणि त्यात ठाकरे यांच्यासोबत वंचितची युती आहे.
राहुल कलाटे हे स्वतः शिवसेनेकडून इच्छुक असतांना त्यांनी उमेदवारी न डेटा वंचित बहुजन आघाडी या त्यांच्यासोबत युती केलेल्या पक्षाने पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांच्यासहित अजित पवार यांची डोकेदुखी ठरणार आहे.
एकूणच चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. खरंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये आता लक्ष्मण जगताप, राहुल कलाटे आणि नाना काटे यांच्यात ही लढत पाहायला मिळणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाचीही अडचण झाली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून नाना काटे यांचाच प्रचार करणार की युतीचा धर्म पाळण्यासाठी कलाटे यांना मदत करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
तर राहुल कलाटे हे एक प्रकारे शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार आहे. त्यातच ज्यांच्या सोबत युती केली आहे त्याच वंचित बहुजन आघाडीने ठाकरे यांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे.