Pooja Chavan suicide case | पूजाच्या वडिलांचे स्टेटमेंट अतिशय दुर्दैवी, तो आवाज संजय राठोड यांचाच, चित्रा वाघ आक्रमक
पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
मुंबई : “पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अजून कोणालाही अटक झालेली नाही. पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिलेले स्टेटमेंट हे अतिशय दुर्दैवी आहे,” असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर पूजाचे वडील लहू चव्हाण (Lahu Chavan) यांनी काल (14 फेब्रुवारी) प्रथमच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्हाला बदनाम करु नका. तिला कर्जाचे टेन्शन आले असावे, असे वक्तव्य केले. याच वक्तव्यावर, तसेच पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना चित्रा वाघ यांनी वरील प्रतिक्रिया दिली. त्या मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या. (Chitra Wagh criticizes Mahavika Aghadi said that Sanjay Rathore have to give resignation)
गृहराज्यमंत्री राठोड यांचे संरक्षण करतायत का?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अजून कोणालाही अटक झालेली नाही. पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिलेले स्टेटमेंट हे अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात जी मुलं साक्षीदार होती त्यांना सुरुवातीला सोडण्यात आलं. आता त्यांचा शोध घेतला जातोय,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, गृहराज्यमंत्री संजय राठोड यांचं संरक्षण करतायत का?, असा खोचक सवालही त्यांनी सरकारला केला.
संजय रोठोड यांची गच्छंती व्हायला हवी
यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमधील आवाज संजय राठोड यांचाचा आहे, असा दावा त्यांनी केला. “प्रशासनाला एक मंत्री सापडत नाहीये. संपूर्ण राज्यासाठी हे दुर्दैवी आहे. या सगळ्या गोष्टी खूप संशयास्पद आहेत. संजय राठोड यांची गच्छंती व्हायला हवी. पोलिसांनी या प्रकरणी तपास करायला हवा,” असे त्या म्हणाल्या. तसेच, मुख्यमंत्र्यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स नीट ऐकल्या नसतील तर त्यांनी त्या नीट ऐकायला हव्यात, असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात नियमानुसारच चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आगामी काळात या प्रकरणात काय खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!
(Chitra Wagh criticizes Mahavika Aghadi said that Sanjay Rathore have to give resignation)