उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर एकमेकींना भिडल्या, चाकणकर यांच्या विधानावर चित्रा वाघ भडकल्या?
उर्फीच्या प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करत रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका चित्रा वाघ यांनी करत सुप्रिया सुळे यांनाही टोला लगावला आहे.
मुंबई : उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून समाज स्वास्थ्यासाठी एकत्र आले पाहिजे असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वेब सिरिजवरुण तेजस्वीनी पंडित यांना नोटिस पाठवणाऱ्या महिला आयोगाने उर्फी जावेदवर काय करणार असा सवाल करत चित्रा वाघ यांनी सवाल उपस्थित केला आहे. उर्फीच्या नंगानाचला त्यांचे समर्थन आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले आहे. एका महिलेने चित्रा वाघ यांना काही व्हिडिओ शेअर केले होते. त्यावेळी त्या महिलेने माझी मुलगी अशा विकृतीला बळी पडल्याचे सांगितले होते. त्यावरून मी हा मुद्दा घेतल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रतिक्रियेवरुन अनेक सवाल उपस्थित केले आहे. यावेळी रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही यासाठी मी बोलले, तिला माझा विरोध नाही तिच्या विकृतीला माझा विरोध आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या आहे.
याशिवाय माझा नंगानाच ला विरोध सुरू राहील आहे, दुर्दैवाने यामध्ये अनेकांनी उड्या घेतल्या आणि त्या अपेक्षित होत्या.
उर्फी जावेदच्या मुद्द्यावर महिला आयोगाची प्रतिक्रिया वाचली त्या महिला आयोगाचे काम काय आहे, महिलांचा मान सन्मान जपणे, महिला आयोग म्हणतय आम्हाला वेळ वाया घालवायच्या नाही ?
महिला आयोगाने यामध्ये हस्तक्षेप का केला नाही, अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे त्यामुळे महिला आयोग जबाबदारी विसरले आहे की काय ?
महिला आयोगाच्या अध्यक्षांना तिथं बसण्याचा अधिकार काय ? दुटप्पीपणा घेणाऱ्या महिला आयोगाचे खरं रूप दाखवते, वेब सिरिजमध्ये अंगप्रदर्शन केल्यावरून नोटिस बजावली होती.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि संजय जाधव यांना त्यांनी नोटिस बजावली होती, धूम्रपान समर्थन अंगप्रदर्शनचा संदेश जात असल्याचे सांगत स्वाधीकराने दखल घेऊन नोटिस पाठविली होती.
उर्फीच्या प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करत रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका चित्रा वाघ यांनी करत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
मोठ्या नेत्या सुप्रिया ताईंनी हा विषय घेतला असता तर मला ही भूमिका घ्यायची वेळ आली नसती, इतक्या दिवसात विषय संपला असता असेही वाघ यांनी म्हंटले आहे.