ठाकरे सरकारचा इतिहास काढला ! टाचणीभर जागाही कुणाला देणार नाही, चित्रा वाघ यांनी ठाकरेंना काय सुनावलं?
उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तोडगा काढता येत नसेल तर सरकार चालवण्याची जबाबदारी मी घेतो असे वक्तव्य केलं होतं या वक्तव्याला चित्र वाघ यांनी उत्तर दिले.
अनिल केऱ्हाळे, जळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचा मुद्दा अधिकच चिघळला आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये येण्यासाठी बंदी घातल्याचा फतवा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फतवा काढला आहे. त्याकरिता महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतिने याला कडाडून विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकार हल्लाबोल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तोडगा काढता येत नसेल तर सीमा वाद मिटवण्याची आणि सरकार चालवण्याची जबाबदारी मी घेतो असं विधान केले होते. या विधानावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर पलटवार केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अडीच वर्ष घरात बसून सरकार चालवणारे उध्दव ठाकरे आज सरकार चालवण्याचं सांगताय, गेल्या अडीच वर्षात फेसबुकवर चालणारं सरकार होतं, आता शिंदे फडणवीसांच लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणारं सरकार आहे.
कुणाला काळजी करण्याची गरज नाही, या महाराष्ट्रची टाचणीभरही जागा कुणाला दिली जाणार नाही असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
हे सरकार अतिशय सक्षमपणे काय करतंय, त्यामुळे शिंदे फडवणीस सरकार सीमा वादाचा प्रश्न सोडवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तोडगा काढता येत नसेल तर सरकार चालवण्याची जबाबदारी मी घेतो असे वक्तव्य केलं होतं या वक्तव्याला चित्र वाघ यांनी उत्तर दिले
चित्रा वाघ यांनी जळगाव दौऱ्यावर असतांना उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत शिंदे-फडणीवस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहे.