लोकशाहीवर विश्वास ठेवत नक्षलवाद्यांना झुगारले, मतदान आणि मतमोजणीही शांततेत…
गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीलाच थेट नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली असल्याने वातावरण प्रचंड तापले होते.
गडचिरोलीः मागील गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी नक्षलवाद्यांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी टार्गेट केले जात आहे. मतदाना आधी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी आमदारासह प्रशासनाला सुरजागड लोह खनिज प्रकल्प बंद करा अन्यथा आम्ही वेगळ्या स्वरुपाने बंद करू अशी दिली धमकी दिली होती. तर त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीवरूनही त्यांनी मतदानाला विरोध दर्शवत आव्हान दिले होते. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींचे मतदान व मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री व अहेरी विधानसभा क्षेत्राचे सध्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनाही नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती.
गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीलाच थेट नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली असल्याने वातावरण प्रचंड तापले होते. त्यातच नक्षलवाद्यांकडून ग्रामपंचायतीच्या मतदानाला विरोधही दर्शवण्यात आला होता. त्यामुळे अनेक गावातून भीतीचे वातावरण पसरले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत नक्षलवाद्यांकडून हस्तक्षेप करण्यात आला. त्यातच लोकशाहीला विरोध दर्शवत मतदान प्रक्रियेलाही त्यांच्याकडून विरोध दर्शवण्यात आला होता.
तरीही गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या धमकीला न घाबरता ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत नक्षलवाद्यांनी डोकं वर काढल्याने प्रशासनाचीही डोकीदुखी वाढली होती.
ग्रामपंचायत निवडणुकीतच नक्षलवाद्यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना धमकी देण्याबरोबरच मतदानालाही विरोध दर्शवण्यात आला होता.
त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तरीही नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक न घालता येथील नागरिकांनी मतदान प्रक्रिया पूर्ण करून मतमोजणीही शांततेत पार पडली आहे.
नक्षलवाद्यांकडून ऐन निवडणुकीत लोकशाहीला आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे प्रशासनासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते.