प्रवासासाठी हक्काने ‘ही’ बस पकडता का? मग काही आता खिशाला झळ पोहोचवण्याची तयारी ठेवा

| Updated on: Feb 15, 2023 | 12:54 PM

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. जुलै 2019 ला नाशिक शहर आणि शहरालगतच्या 20 किलोमीटर अंतरावर ही सेवा सुरू आहे.

प्रवासासाठी हक्काने ही बस पकडता का? मग काही आता खिशाला झळ पोहोचवण्याची तयारी ठेवा
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील ( Nashik City Bus ) नागरिकांना सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ही चांगल्या दर्जाची मिळावी यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच सिटीलिंकची ( City Linc ) स्थापना करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी च्या मध्यरात्रीपासून सिटी लिंकच्या प्रवास भाडे वाढ लागू करण्यात आलेली आहे. पाच टक्केही भाडे वाढ करण्यात आली आहे. भाडेवाढीमुळे काही प्रमाणात सिटीलींकच्या कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र हा निर्णय घेत असताना सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र जवळ बसणार आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. जुलै 2019 ला नाशिक शहर आणि शहरालगतच्या 20 किलोमीटर अंतरावर ही सेवा सुरू आहे.

नाशिक शहराबरोबरक ग्रामीण भागात देखील सिटीलींक च्या माध्यमातून नाशिकची बस सेवा सुरू आहे. सद्यस्थिती ही बस सेवा तोट्यात आहे. तरीही सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहोत.

हे सुद्धा वाचा

याशिवाय नागरिकांना सार्वजनिक परिवहन व्यवस्था चांगल्या दर्जाची देण्याकरता सिटी लिंकच्या माध्यमातून बससेवा सुरू करण्याचा निर्णय नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला होता.

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ही बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. सिटीलिंक आणि नाशिक महानगर पालिकेच्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो.

मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेले सीएनजी चे आणि पेट्रोलचे दर पाहता आता पुन्हा एकदा अवघ्या 45 दिवसांमध्ये सिटीलिंकच्या बस तिकीटामध्ये पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली ही बस सेवा सध्या तोट्यात सुरू आहे. 45 दिवसातच पुन्हा भाडेवाढ झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

जानेवारी 2022 मध्ये पहिल्या टप्प्यात सिटी लिंकच्या बस टिकीटात पाच टक्के वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा 45 दिवसांच्या अंतराने पाच टक्के भाडेवाढ झाल्याने नाशिककरांना खिशाला कात्री लागणार आहे.

खरं म्हणजे सुरुवातीपासूनच ही बससेवा वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या महसभेत बससेवा सुरू करण्यावरून अनेक सदस्यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे बससेवा सुरुवातपासूनच वादात राहिली आहे.

त्यानंतरही नाशिक सिटी लिंकच्या बस विविध कारणांनी चर्चेत आल्या आहे. कधी कामगारांना वेतन दिले नाही त्यावरून तर कधी दिवाळी बोनस दिला नाही यावरून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे नेहमी सिटी लिंक बससेवा चर्चेत असते.