Aryan Khan case : ड्रग प्रकरणात क्लीन चिट; काय आहे आर्यन खान ड्रग प्रकरण, काय आहेत आरोप पत्रातील ठळक मुद्दे?

तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंट ज्यांच्याकडून अमली पदार्थ जप्त केले होते. तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात अरबाज मर्चंट याने असे म्हटले आहे की, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले ड्रग हे आर्यनसाठी नव्हते

Aryan Khan case : ड्रग प्रकरणात क्लीन चिट; काय आहे आर्यन खान ड्रग प्रकरण, काय आहेत आरोप पत्रातील ठळक मुद्दे?
आर्यन खानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 11:09 PM

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan case)याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आज निर्णय दिला. तर आर्यनच्या ताब्यातून कोणतेही ड्रग्स सापडले नसल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच त्याला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे. आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीने (NCB)आर्यंनच्या सुरुवातीच्या जबाबात त्याने अरबाज सोबत सापडलेले ड्रग्स सेवनासाठी असल्याचे सांगितले, पण ते ड्रग्स कोणासाठी आणले हे सांगितले नाही. तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर 2 ऑक्टोबर 2021 रोजी अरबाज मर्चन्ट जो आर्यन खान सोबत क्रूजवर प्रवास करत होता ने दिलेल्या पहिल्या जबाबात तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांच्या समोर चरस आपल्या बुटात ठेवल्याचे मान्य केले होते. मात्र आता त्याच्याकडे कोणतेही ड्रग्स सापडले नसल्याचे तपासात समोर आल्याने क्लीन चिट मिळाली आहे. तर काय आहे आर्यन खान ड्रग प्रकरण (Drugs Case) आणि आरोप पत्रातील ठळक मुद्दे कोणते होते हे जाणून घेऊ

एनसीबी सध्या खूप सक्रिय

2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता आणि या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केलं होतं. सदर क्रूजवर ड्रग पार्टी सुरू आहे, अशी माहिती तेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र कारवाईदरम्यान एनसीबी टीमने आर्यन खान अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तिघांसोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

त्यावेळी आर्यंनच्या सुरुवातीच्या जबाबात त्याने अरबाज सोबत सापडलेले ड्रग्स सेवनासाठी असल्याचे सांगितले, पण ते ड्रग्स कोणासाठी आणले हे सांगितले नाही. तसेच त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आर्यन किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी असल्याचे त्याने सांगितले नाही. मात्र आपल्या दुसऱ्या जबाबात अरबाज मर्चन्ट यांनी आशिष रंजन प्रसाद यांना सांगितले की आर्यनला हे माहित होते की तो (अरबाज) अधूनमधून ड्रग्स सेवन करतो आणि म्हणूनच आर्यन ने अरबाजला असा सल्ला दिला की, क्रूझमध्ये कोणीही ड्रग्स घेऊन येऊ नका. कारण एनसीबी सध्या खूप सक्रिय आहे आणि ते (अरबाज आणि आर्यन) संकटात येऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

ड्रग हे आर्यनसाठी नव्हते

तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंट ज्यांच्याकडून अमली पदार्थ जप्त केले होते. तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात अरबाज मर्चंट याने असे म्हटले आहे की, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले ड्रग हे आर्यनसाठी नव्हते किंवा जप्त केलेल्या ड्रग्ज (चरस) खरेदी करण्यात कोणत्याही प्रकारे त्याची मदत केली नव्हती.

कोर्‍या कागदांवर स्वाक्षरी

या प्रकरणाच्या तपासाचा वेळी उपस्थित असलेल्या दोन स्वतंत्र साक्षीदारांपैकी त्याचा नुकताच मरण पावलेला प्रभाकर यांचा 11.11.2021 रोजी नोंदवलेल्या जबाब नोंदवला होता. त्यात त्याने म्हटले आहे की, त्यावेळी उपस्थित असलेले दुसरे साक्षीदार किरण गोसावी यांनी प्रभाकर साईलला कोर्‍या कागदांवर स्वाक्षरी करण्यासाठी सांगितले होते.

परवानगी शिवाय whats app ची पडताळणी

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर अरबाजने ड्रग्सच्या संदर्भात आर्यनच्या सहभागाबाबत स्पष्ट नकार दिला होता. तरीही तपास अधिकारी आर्यनच्या परवानगी शिवाय त्याचे whats app चॅट्स तपासत होते. अगदी औपचारिकपणे आर्यनचा मोबाईल जप्त केला गेला. त्यावेळी असे दिसते की तपास अधिकाऱ्यास आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यास प्रवृत होते. तर हाच मुद्दा उचलत न्यायालये काहीवेळा तपास अधिकाऱ्यांच्या हेतूवर शंका घेतली होती.

फोन स्वेच्छेने दिला

क्रूझ टर्मिनलवर झडती आणि जप्तीनंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यात आर्यन खानचा मोबाईल फोन त्याने स्वेच्छेने तपास अधिकाऱ्यांकडे दिल्याचा उल्लेख आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, औपचारिक जप्ती प्रक्रियेचे पालन केले गेले नाही. तपासात पुढे असे उघड झाले आहे की आर्यनच्या मोबाईलचा डेटा काढण्यात आला होता आणि त्यात गांजा, चरस इत्यादींच्या सेवनाचे संदर्भ असणारे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स होते. साक्षीदार आणि आरोपींना व्हॉट्सअॅप चॅटमधील सामग्रीच्या आधारे तपासात सामील होण्यास सांगितले होते.

जर Whats app चॅट्सची सामग्री पुराव्याचा प्राथमिक स्रोत असेल. तर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा Whats app चॅटच्या पुराव्या मूल्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. SLP (8636/2021) मधील A2Z Infraservices Ltd. Vs Quippo Infrastructure Ltd. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लक्षात घेण्यासारखा आहे. त्यात न्यायालयाने म्हटलं आहे की, “आज काल Whats app मेसेजचे स्पष्ट मूल्य काय आहे? काहीही तयार करता येतं आणि हटवले जाऊ शकते. त्याला काही तथ्य नाही त्यामुळे Whats app संदेशांना आपल्याला सत्य मानता येणार नाही. आर्यनच्या फोनमधून काढलेल्या डेटाची सत्यता लक्षात घेता शंकास्पद आहे कारण आर्यनचा फोन कसा आणि केव्हा जप्त करण्यात आला हे सांगणारे उत्तर एनसीबीकडे नव्हते.

आयोजकांचा हात नाही

2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता आणि या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केलं होतं. तसेच त्यावेळी कॉर्डेलिया क्रूझवर 2, 3 आणि 4 ऑक्टोबर, 2022 रोजी जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या विविध जप्ती संदर्भात आयोजकांचा हात नाही असेही सांगण्यात आले होते. तर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे रेकॉर्डवर नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आयोजकांविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करू नये, अशी शिफारस आरोपपत्रात करण्यात आली आहे.

वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही

अवीन साहू यांच्या विरुद्ध मिळालेले पुरव्यावरून अमली पदार्थ जप्त करण्यात आले नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने 1 ग्रॅम गांजाचे सेवन केल्ल्याचे कबूल केले होते. मात्र त्याने गांजा सेवन केल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. पुरेशा पुराव्याअभावी त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत कोणत्याही गुन्ह्याचा आरोप ठेवून तक्रार दाखल करू नये, अशीही शिफारस आरोपपत्रात करण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.