Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonable Rain: उत्तर महाराष्ट्राला बगल, आता अवकाळीचा भर मराठावाडा, मध्य महाराष्ट्र अन् कोकणावर

भर उन्हाळ्यात राज्यातील काही भागामध्ये चक्क पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असला तरी राज्यातील काही विभागात उन्हाच्या झळा तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्याची अनुभती अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु असून हा सिलसिला अजून कायमच आहे.

Unseasonable Rain: उत्तर महाराष्ट्राला बगल, आता अवकाळीचा भर मराठावाडा, मध्य महाराष्ट्र अन् कोकणावर
महाराष्ट्रातील काही विभागात अवकाळीची अवकृपा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 2:35 PM

मुंबई : भर (Summer Season) उन्हाळ्यात राज्यातील काही भागामध्ये चक्क पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा अंदाज भारतीय (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला असला तरी राज्यातील काही विभागात उन्हाच्या झळा तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये ढगाळ वातावरणामुळे (Rain) पावसाळ्याची अनुभती अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु असून हा सिलसिला अजून कायमच आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरीत राज्यात उन्हाचा चटका हा कायम राहणार आहे.गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यातही ढगाळ वातावरण निर्माण झाले असून उत्तर सोलापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रात पारा चढणार

यापूर्वी उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीची अवकृपा झाली होती. आता उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा ह्या अधिक तीव्र होत आहेत. या भागातील कमाल तापमान 41 अंशाच्या पुढे आहे. चंद्रपुरात गुरुवारी 43.02 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नगर, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा येथे 41 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.

…म्हणून पावसाची शक्यता

दरवर्षी वातावरणात बदल हा ठरलेला आहे. पण यंदा तो अधिक तीव्रतेने जाणवत आहे. पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, उत्तर कर्नाटकपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, या भागात ढगांची दाटी झाली आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर देखील होत आहेत.

फळबागांचे नुकसान, सोयाबीनला मात्र पोषक वातावरण

कोकणासह आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. द्राक्ष हंगामाच्या सुरवातीपासूनच यंदा अवकाळीची अवकृपा होती. आता काढणी आणि हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही सुरुच आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्यात झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत तर आंब्याची गळती झाली आहे. तर दुसरीकडे उन्हाळी सोयाबीनला या ढगाळ वातावरणाचा फायदा होत आहे. यामुळे अधिकचे पाणी देण्याची गरज भासत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

Watermelon : कलिंगडला ‘विकेल ते पिकेल’ अभियानाचा आधार, शेतकऱ्यांनी कसा घ्यायचा लाभ? वाचा सविस्तर

Solapur : अखेर ज्याची भीती तेच घडले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडले

Central Government : Zero Budget शेतीसाठी मोठी आर्थिक तरतूद, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.