मोठी बातमी: कोल्हापुरातील बंद झालेली कोरोना सेंटर्स पुन्हा सुरु करणार

जिल्ह्यातील कोरोना सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. | Kolhapur Coronavirus

मोठी बातमी: कोल्हापुरातील बंद झालेली कोरोना सेंटर्स पुन्हा सुरु करणार
जिल्ह्यातील कोरोना सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 8:29 AM

कोल्हापूर: राज्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासन कमालीचे सतर्क झाले. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापुरातील बंद केलेली कोरोना सेंटर्स (Covid centres) पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांप्रमाणे कोल्हापुरातही रुग्णवाढ होऊ शकते. हीच शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने हा निर्णय घेतला. (Covid centres in Kolhapur)

जिल्ह्यातील कोरोना सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कोरोना सेंटर्सच्या कामावर देररेख ठेवेल. या कोव्हिड केंद्रांवर जीवनरक्षक प्रणालीसह (व्हेंटिलेटर्स) इतर आवश्यक सुविधांची सोय करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

10 मंगल कार्यालयांवर धडक कारवाई

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दीच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 12 मंगल कार्यालये आणि समारंभ आयोजकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. या माध्यमातून पालिकेने आतापर्यंत 34 लाखांचा दंड वसूल केला आहे.

मंगल कार्यालयांची तपासणी करण्यासाठी पालिकेकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून रविवारी जिल्ह्यातील 27 मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली.

कोरोनाचा धोका वाढल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट; राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना

महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोना रुग्णांची (Coivd 19) संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्यामुळे केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे.

लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे. मार्च 2021 पासून सहआजार (को-मॉर्बिडिटी) असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल. त्यासाठी आगामी काळात उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य उपकेंद्रे यांनी १ मार्चपासून लसीकरणाची आणखी व्यापक व्यवस्था करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर, शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायचा का? मुख्यमंत्र्यांचं जनतेला 8 दिवसांचं अल्टीमेटम

लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात, नवरदेवासह बाप, भाऊ-भावजय पॉझिटिव्ह, वऱ्हाडी क्वारन्टाईन!

(Covid centres in Kolhapur)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.