आधी सुजयला पकडलं, राधाकृष्ण सापडले, वैभवला पकडलं मधुकर पिचड मिळाले, मुख्यमंत्र्यांनी रणनीती सांगितली!

भाजपमध्ये आज मेगाभरती पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांच्या भाजप प्रवेशामागची रणनीती सांगितली.| CM Devendra Fadnavis tells Strategies behind the congress NCP leaders joining BJP

आधी सुजयला पकडलं, राधाकृष्ण सापडले, वैभवला पकडलं मधुकर पिचड मिळाले, मुख्यमंत्र्यांनी रणनीती सांगितली!
Follow us
| Updated on: Jul 31, 2019 | 1:05 PM

मुंबई : भाजपमध्ये आज मेगाभरती पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड (Madhukar Pichad), त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) , मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांच्या भाजप प्रवेशामागची रणनीती सांगितली. ते म्हणाले, “आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने मधुकर पिचड सापडले, त्याशिवाय आधी रणजीतसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेतल्याने विजयसिंह मोहिते पाटील आपोआप आले”  मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने गरवारे क्लबहाऊसमध्ये एकच हशा पिकला.

मधुकर पिचड आणि कालिदास कोळंबकर यांच्या प्रवेशाने भाजपमध्ये अनुभवाची मांदियाळी आली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मधुकर पिचडांचं कौतुक

“आज भाजपा परिवारासाठी आनंदाची बाब आहे. आमच्याजवळ ज्येष्ठ नेत्यांची मांदियाळी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ अनुभव असलेला सज्जन प्रवृत्तीचा मधुकर पिचड यांच्यासारखा नेता पक्षात आला आहे. कालिदास कोलंबकर यांच्यासारखा सामान्य जनतेतील माणूस आहे. शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे यापूर्वीच आमच्याकडे आले, आज छत्रपती शिवरायांचे वंशज शिवेंद्रराजे आमच्या पक्षात आले आहेत”, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

मंदाताई आणि संदीप नाईक आणि सागर नाईक सर्व आले तर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना आशीर्वाद द्यावाच लागेल. आम्ही सुजय यांना आधी पकडलं, मग राधाकृष्ण आले, तसचं आम्ही वैभव पिचड यांना घेतलं आणि मधुकर पिचड आले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मंदाताई-चित्राताई भाजपमध्ये

“मंदाताईंनंतर चित्राताई आल्याने राष्ट्रवादीमध्ये कोणी महिला नेत्या राहिल्या नाहीत. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे पवार साहेबांना बोलावं लागलं, याचा अर्थ त्यांचं काम किती मोठं आहे हे दिसून येतं”, असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय चित्राताई या वेळ आल्यानंतर पवार साहेबांना नक्की उत्तर देतील, असंही फडणवीस म्हणाले.

धाक दाखवायचे दिवस गेले

धाक दाखवून प्रवेश करून देण्याचे भाजपचे दिवस राहिले नाहीत. आधी भाजप इतरांच्या मागे फिरत होता, आता तसं नाही. भाजप आश्रमशाळा नाही कोणीही यावं आणि पक्षप्रवेश करावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

स्वबळावर नाही तर युती अभेद्य

शिवसेना-भाजप वेगळं लढणार अशा बातम्या येत आहेत, त्यांना सांगू इच्छितो, आम्ही मित्रपक्ष मिळूनच निवडणूक लढू, महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार, बहुमताचा नवा विक्रम रचू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष यांची युती अभेद्य आहे. कोणीही वेगळ लढायचं असं ठरलं नाही. पुन्हा एकदा राज्यात युतीचे सरकार येणार. 8 ते 15  दिवसात कोणत्या जागा कोणाला द्यायचं ते ठरवू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे

  1. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड
  2. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड
  3. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले
  4. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक
  5. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर
  6. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ
  7. नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक
  8. महात्मा फुले यांच्या वंशज नीता हुले
  9. माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.