बाबाासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही माई का लाल रद्द करू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

"आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही", असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते वर्ध्यात बोलत होते.

बाबाासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही माई का लाल रद्द करू शकत नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 1:16 PM

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते वर्ध्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आज वर्ध्यात पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचे लोकापर्ण केले जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

देशाच्या विकासाला हातभार लागणार

“आता भारताचं २१ वं शतक आहे. मोदी हे देशाचे कर्णधार आहेत. मोदींनी देशातील महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. दहा वर्षात १० कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या. आज अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू होत आहे. त्यासाठी महिलांना २५ लाखाचं अर्थसहाय्य मिळणार आहेत. १ हजार कॉलेजात आचार्य चाणक्य कौशल्य विभाग सुरू करत आहोत. पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचीही सुरुवात होणार आहे. या पार्कात दोन लाख रोजगार मिळणार आहे. या मुळे परिसराचा मेकओव्हर होणार आहे. देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही”

काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही. जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत कोणताही मायचा लाल आरक्षण रद्द करू शकत नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.

“हा विकास तुम्हाला रोखायचा आहे का?”

“काही लोक म्हणतात ३७० कलम पुन्हा बहाल करू. ते दहशतवाद्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. हे कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकास झाला. हा विकास तुम्हाला रोखायचा आहे का?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे. “सामान्य माणसाचा सन्मान वाढवणं त्यांची ताकद वाढवण्याचं काम मोदी करत आहेत. त्यामुळेच मोदींनी वन नेशन वन इलेक्शन योजना आणली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.