Cm Eknath Shinde : हॅलो…एकनाथ शिंदे बोलतोय, मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, पुरात अडकलेल्यांना मदत करण्याच्या सूचना

अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. याच पूरस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून आढावा घेतला आहे. हॅलो...मी एकनाथ शिंदे बोलतोय म्हणत त्यांनी थेट कलेक्टरला फोन लावून काही सूचना केल्या आहेत.

Cm Eknath Shinde : हॅलो...एकनाथ शिंदे बोलतोय, मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, पुरात अडकलेल्यांना मदत करण्याच्या सूचना
हॅलो...एकनाथ शिंदे बोलतोय, मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, पुरात अडकलेल्यांना मदत करण्याच्या सूचनाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 7:17 PM

मुंबई : राज्यातलं राजकारण सध्या जगभरात चर्चेत आहे, राज्यात काही दिवसांपूर्वीच नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ (Ekanth Shinde) घेतली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या आज दिल्ली दरबारी हायव्होल्टेज भेटीगाठी सुरू आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी(PM Modi), अमित शाह (Amit Shah), राजनाथ सिंह अशा नेत्यांच्या भेटीसाठी घेतल्या आहेत. पण पण दिल्लीत गेल्यानंतर ही एकनाथ शिंदे यांचं महाराष्ट्रातलं लक्ष काही कमी झालं नाही. याची प्रचिती आज पुन्हा आलीय. इकडे महाराष्ट्रात सध्या पावसानं गेल्या दोन-तीन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. तिकडे हिंगोली-नांदेडात तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गाव पाण्याखाली जाण्याच्या स्थितीत आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. याच पूरस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून आढावा घेतला आहे. हॅलो…मी एकनाथ शिंदे बोलतोय म्हणत त्यांनी थेट कलेक्टरला फोन लावून काही सूचना केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावल्याचा व्हिडिओ

फोनवरती नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना फोन लावला आणि आसना नदीच्या पूरस्थिती बाबत आढावा घेतला. समोरून जिल्हा अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाऊस थांबण्याची आणि आता पाणी ओसरत असल्याचे माहिती दिली. ज्या गावाबाबतची माहिती एकनाथ शिंदे यांच्याकडे आली होती, त्या गावाबाबतही शिंदे यांनी विचारणा केली. तिथून नागरिकांचे बचाव कार्य सुरू आहे का? याचाही आढावा शिंदे यांनी फोनवरून घेतला.  यावेळी पुराच्या पाण्याने वेडा घातलेले नागरिक हे घराच्या छतावर आणि झाडावर चढून बसलेले असल्याची आणि त्यांना त्यांना बाहेर काढण्यासाठी लवकरच मदत कार्य पोहोचत असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदेंना दिली.

लोकांना हवी ती मदत पुरवा

त्या लोकांना ताबडतोब रेस्क्यू करा, अशा थेट सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. अनेक लोकांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिफ्ट केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच जेवणाची सर्व व्यवस्थाही त्या लोकांची करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लोकांची पिण्याच्या पाण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था करा, कुणाला कोणत्याही गोष्टीची गैरसोयी होणार नाही. याची काळजी घ्या आणि कुठेही जीवित हानी होणार नाही, याला प्राथमिकता द्या आणि सर्व लोक ग्राउंड वरती राहून काम करा, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. सर्व यंत्रणांचा वापर करा, असेही शिंदे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, तसेच इतर सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश हे दिले, मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंनी कामाचा धडाका लावला आहे. तिच परिस्थिती आजही दिसून आली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.