“मी काय त्यांना उत्तर द्यायला आलो नाही” ; एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगितले

उद्धव ठाकरे यांनी गद्दारी, खोके यांच्याशिवाय त्यांच्याकडे बोलण्यासाठी आता दुसरे शब्दच नाहीत. तेही शब्द ते फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी करत असल्याचा घणाघातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

मी काय त्यांना उत्तर द्यायला आलो नाही ; एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगितले
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 8:13 PM

खेड / रत्नागिरी : गद्दारी आम्ही केली नाही तर मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी तुम्ही 2019 मध्ये केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली आहे. ज्यावेळी बंडखोरी केली त्यावेळी बंडखोरी केली नसती तर तिच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबरोबर बेईमानी ठरली असती अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून एकच रडगाणे आणि मोजकेच शब्द वापरून त्यानी आमच्या टीका केली आहे मात्र त्याला आम्ही उत्तर देणार नाही अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.

रत्नागिरीतील खेडमधील गोळी मैदानावरून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबरोबर बेईमानी केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केले.

आज खेडमध्ये सभा घेत आहोत ती काही ठाकरे गटाच्या आदळआपटला आणि थयथयाटाला उत्तर देण्यासाठी आलो नाही तर कोकणातील शिवसैनिकांच्या प्रेमाखातर ही विराट सभा घेत असल्याचे सांगत त्यांनी रामदास कदम आणि योगेश कदम यांचाही यावेळी गौरव केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेतून ठाकरे गटाबरोबरच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी राहुल गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यांच्यासोबत तुम्ही जाता, त्यांच्या गळ्यात गळा घालता असं म्हणत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी गद्दारी, खोके यांच्याशिवाय त्यांच्याकडे बोलण्यासाठी आता दुसरे शब्दच नाहीत. तेही शब्द ते फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी करत असल्याचा घणाघातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.