Cm Eknath Shinde : ही तर फक्त सुरूवात, आगे आगे देखो होता है क्या…मुख्यमंत्र्यांची दिल्लीतून पहिली प्रतिक्रिया, घेणार शाह, मोदींची भेट

एकनाथ शिंदे हे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर दाखल होताच, ये तो बस शुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या... अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Cm Eknath Shinde : ही तर फक्त सुरूवात, आगे आगे देखो होता है क्या...मुख्यमंत्र्यांची दिल्लीतून पहिली प्रतिक्रिया, घेणार शाह, मोदींची भेट
मुख्यमंत्र्यांची दिल्लीतून पहिली प्रतिक्रियाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 8:21 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक बंडानंतर, मोठ्या सत्तांतरानंतर आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीत ते अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांनाही भेटणार आहेत. अमित शाह (Amit Shah) आणि एकनाथ शिंदे यांची आजच भेट होणार आहे. त्यांच्या भेटीत महाराष्ट्रातील खातेवाटपाबाबत चर्चाही होऊ शकते. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यात कॅबिनेटचा विस्तार हा अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्या दृष्टीने हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. एकनाथ शिंदे हे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर दाखल होताच, ये तो बस शुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या… अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री दिल्लीतून काय म्हणाले?

आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. ते आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही सिद्ध केलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी तशी आम्हाला मान्यता दिली आहे. मी काही बोलणार नाही. मी पंतप्रधानांना भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला सविस्तर सांगेल, पण आत्ता तर फक्त सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रासाठी आणखी खूप काम करायचं आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत दाखल होताच दिली आहे. तसेच आम्हाला कायद्यावर विश्वास आहे. आम्ही घटनेप्रमाणे निर्णय घेतला आहे. असे ते आगामी सुनावणीबाबतही म्हणाले आहेत.

नव्या कॅबिनेटचा शपथविधी कधी?

एकनाथ शिंदे हे दिल्ली दौरा आटोपून महाराष्ट्रात परत आल्यानंतर लवकरच महाराष्ट्रात नवं मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता आहे. आषाढी वारीच्या अगोदरच महाराष्ट्रात आणखी काही मंत्री शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र सध्या तरी ती शक्यता धूसर आहे. आषाढी वारी नंतरच महाराष्ट्रातलं नवं मंत्रिमंडळ शपथ घेण्याची शक्यता आहे. खाते वाटपाबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातही अनेक बैठका झाल्या आहेत. आज अमित शाह आणि शिंदे यांच्यात ही त्याचबाबत चर्चा होईल. एकनाथ शिंदे यांच्या गटातील तसेच भाजपमधील अनेक नेते हे मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते आणि या दिल्ली भेटीत नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उद्याही त्यांच्या अनेक मोठ्या भेटीगाठी आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.