‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेसाठी आहे ही महत्वाची अट, तरच मिळणार लाभ, आदिती तटकरे यांनी केले स्पष्ट

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिलांच्या बॅंक खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत. जो लाभार्थी निकष पूर्ण करतो त्याच्या अकाऊंटमध्ये हा पैसा जाणार असल्याने या योजनेचे विरोधकांनी स्वागत करायला हवे असेही आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेसाठी आहे ही महत्वाची अट, तरच मिळणार लाभ, आदिती तटकरे यांनी केले स्पष्ट
aditi tatkareImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 3:34 PM

मध्यप्रदेशातील ‘लाडली बहेना’ या योजनेचा भाजपाला प्रचंड फायदा झाला. मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना प्रचंड मते या योजनेमुळे मिळाली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेवर योजनांची अक्षरश: बरसात केली आहे. विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल लाडकी बहीण नावाने या योजनेची घोषणा केली आहे. परंतू या योजनेचा फायदा कोणत्या वर्गातील महिलांना मिळणार यावरून आता सत्य बाहेर आले आहे.

लाडकी बहीण या योजनेचा फायदा राज्यातील अडीच कोटी महिलांना होणार असल्याचे महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. या योजनेते 1,500 रुपये महिलांना मिळणार आहेत. यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले की या पूर्वी आपल्या राज्याने लेक माझी लाडकी ही योजना नवीन जन्माला येणाऱ्या कन्यांसाठी आणली होती. अडीच लाख पेक्षा जास्त बालिकांना हा लाभ दिला जातो. या योजनेसाठी 70 ते 80 हजाराहून अधिक प्रस्ताव सादर झाले. साधारणपणे 25 ते 30 हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला आहे. पुढच्या काळात 60 ते 70 हजार लेकींना लाभ मिळणार आहे. आता ‘मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी’ योजना जाहीर झाली आहे. अडीच कोटी महिलांच्या खात्यात थेट 1,500 रुपये जमा होणार आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने DBT च्या लाभार्थ्यांना थेट मदत मिळते. थेट अकाऊंटमध्ये हा निधी वितरीत होतो. जो लाभार्थी निकष पूर्ण करतो त्याच्या अकाऊंटमध्ये हा पैसा जाणार असल्याने या योजनेचे विरोधकांनी स्वागत करायला हवे असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या नावाने असणार आहे. योजनेत 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ होणार आहे, मात्र, लाडकी बहीण योजनेचा लाभ हा राज्यातील अडीच कोटी महिलांना मिळणार असला तरी याच्या काही अटी देखील आहेत. अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारी कामात असणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

गुलाबी रिक्षा योजना

‘पिंक रिक्षा योजना’ देखील आम्ही आणली आहे. त्याअंतर्गत आम्ही 10 हजार गुलाबी रिक्षा आम्ही या महिलांना चालवण्यासाठी देणार आहोत असेही आदिती तटकरे यांनी सांगितले. राजीव गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थी संख्या कमी आहे. पण आम्ही या योजनेत 500 रुपयांची वाढ करुन ही योजना 1,500 रुपयांपर्यंत घेऊन आलो आहोत. कोणत्याही एकाच सरकारी योजनेचा लाभ हा लाभार्थी यांना होणार आहे. कृषीसाठी जी योजना आहे केंद्रातून 12 हजार रुपयांची मदत त्यात मिळते. मात्र कोणतीही अडचण नाही कारण ही योजना पुरुषांच्या नावाने आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.