सुप्रीम कोर्टाने मार्ग दाखवलाय, आता पंतप्रधान-राष्ट्रपतींनी मराठा समाजाचा अनादर करु नये, उद्धव ठाकरेंनी हात जोडले

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नसून केंद्र सरकारचा आहे असं सांगितल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने मार्ग दाखवलाय, आता पंतप्रधान-राष्ट्रपतींनी मराठा समाजाचा अनादर करु नये, उद्धव ठाकरेंनी हात जोडले
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 9:07 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीसोबतच मराठा आरक्षणाच्या ज्वलंत विषयावरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याचं म्हटलं. तसेच हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने न्याय कुठे मिळेल हेही सांगितल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नसून केंद्र सरकारचा आहे असं सांगितल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले (CM Uddhav Thackeray comment on Supreme Court decision on Maratha reservation).

उद्धव ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी सर्व पक्षांनी एकमुखी एकमताने मराठा आरक्षणाला आरक्षण देण्याचा कायदा केला. उच्च न्यायालयात लढाई जिंकली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळालं. नेमक्या या कोरोनाच्या लढ्यातच हा निराशाजनक निकाल आला. सर्वांनी एकमुखाने घेतलेल्या या आरक्षणाविरोधात निकाल दिला. काहीजण सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली नसल्याचा आरोप करतात. मात्र, हे खंर नाही. उच्च न्यायालयात असलेले वकीलच सर्वोच्च न्यायालयात होते. उलट त्यांना मदतीसाठी आणखी वकील दिली. मराठा समाजाने आणि नेत्यांनी खूप संयमी प्रतिक्रिया दिली. थयथयाट केला नाही. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी खूप चांगली भूमिका घेतली.”

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर पुढे काय?

“सर्वोच्च न्यायालयाने पुढे न्याय कुठे मिळेल हे सांगितलंय. अशोक चव्हाण यांचा मराठा आरक्षणाचा खूप चांगला अभ्यास आहे. त्यांनी मागील काळात खूप बैठका घेतल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना नसून केंद्र सरकारला आहे असं सांगितलं. असं करुन सर्वोच्च न्यायालयाने न्याय कुठे मिळेल हे सांगितलंय. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की मोदींनी कल 300 प्रमाणेच हिंमत आणि संवेदनशीलता मराठा आरक्षणात दाखवावी,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाली असून त्याचा अभ्यास सुरु झालाय. त्यात आणखी काही मार्ग दाखवले आहेत का? हेही तपासले जातील. आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. ही मागणी एका समाजाची नाही, त्यामुळे या मागणीचा अनादर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि केंद्र सरकार करणार नाही अशी मला आशा आहे.”

हेही वाचा :

Maratha Reservation Live | सुप्रीम कोर्टाने निकालातून पुढचा मार्ग दाखवला, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही केंद्राची इच्छा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आठवलेंनी सांगितला ‘हा’ उपाय; पंतप्रधानांना पत्र देणार

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray comment on Supreme Court decision on Maratha reservation

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.