Maha Job App | मुख्यमंत्र्यांकडून ‘महाजॉब्स’ ॲप लाँच, Log in कसे कराल?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महाजॉब्स ॲपचे लॉचिंग करण्यात (CM Uddhav Thackeray launch Mahajobs Mobile Application) आले.

Maha Job App | मुख्यमंत्र्यांकडून 'महाजॉब्स' ॲप लाँच, Log in कसे कराल?
Follow us
| Updated on: Jul 28, 2020 | 12:06 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्योग विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या महाजॉब्स ॲपचे लॉचिंग करण्यात आले. या निमित्ताने उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (CM Uddhav Thackeray launch Mahajobs Mobile Application)

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्ज वेबपोर्टलेचे उद्घाटन उद्धाटन केले होते. या अॅपला अवघ्या दोन दिवसांत लाखभर तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती.

तरीही ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी, तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार महाजॉब्ज हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाजॉब्ज ॲपचे अनावरण करण्यात आले.

मोबाईल ॲपमुळे तरुणांना नोकरी शोधणे शक्य होईल. आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येईल. तसेच तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाईलद्वारे सहज मिळेल. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कसे कराल लॉगिन?

  • वैयक्तिक माहिती( नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.)
  • मोबाइल क्रमांक( आवश्यक)
  • इमेल आयडी(वैकल्पिक)
  • अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा
  • पॅन क्रमांक (वैयल्पिक, उपलब्ध असल्यास)
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र( जोडणे आवश्यक)

ॲपची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये

  • सुलभ नोंदणी प्रक्रिया, नोकरी शोधणारे मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी करु शकतात. ज्यामध्ये त्यांना ओटीपी प्राप्त होईल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नोंदणीनंतर वापरकर्ता मोबाइल किंवा ई-मेलद्वारे लॉगिन करुन आपले प्रोफाइल भरू शकतो.
  • नोकरी शोधणारा प्रोफाईल आणि बायोडेटा काही सोप्या क्लिकसह अपडेट करून अर्ज करू शकतात. ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक माहिती, कौशल्य, अनुभव, कोणत्या जिल्ह्यात काम करण्याची इच्छा आहे. रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. नवीन कौशल्ये आणि इतर माहिती तो भरु शकतो. संपूर्ण माहिती भरलेले प्रोफाईल उद्योजकांना दिसतील.
  • नोकरी शोधक आपले कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, मागील कामाचा अनुभव, क्षेत्र, प्रोफाइल तपशील, उद्योगाच्या पसंतीनुसार संबंधित नोकऱ्या शोधू शकतात. यासाठी वेगवेगळ्या फिल्टरची सोय दिलेली आहे.
  • नोकरी शोधणारे अनेक ठिकाणी अर्ज करु शकतात.
  • नोकरी शोधणारे अर्ज केलेल्या नोकरीची स्थिती सहजपणे पाहू आणि ट्रॅक करु शकतात. उद्योजकाने त्याला शॉर्टलिस्ट केले असल्याचे तसेच मुलाखतीनंतर निवड केल्यास त्यासंबंधी अलर्ट पाठविले जातील. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संगणकावर लॅनिंग करून पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी मोबाइल झटपट पाहता येईल.
  • फ्रेशर्स तसेच अनुभवी यासाठी नोंदणी करू शकतात.
  • नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामूल्य आहे.
  • अँड्रॉइड मोबाइलवर हे ॲप उपलब्ध असेल.

(CM Uddhav Thackeray launch Mahajobs Mobile Application)

संबंधित बातम्या : 

Mahajobs | उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी, एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.