मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 7 जूनपासून 5 टप्प्यात अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे (Maharashtra 5 level unlock plan) ठरवण्यात आले आहेत. (Maharashtra government Unlock Order from 7 June)
मध्यरात्री आदेश जारी
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काही दिवसांपूर्वी अनलॉकबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर काल 4 जूनला मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.
जिल्हा | भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) | पॉझिटिव्हिटी दर (टक्के) |
पहिला टप्पा | ||
अहमदनगर | २४.४८ | ४.३० |
चंद्रपूर | ९.३० | ३.०९ |
धुळे | ४.२५ | २.५४ |
गोंदिया | ६.३२ | २.३७ |
जळगाव | १५.१७ | १.६७ |
जालना | १७.६५ | २.०५ |
लातूर | १५.१३ | ४.२४ |
नागपूर | ८.१३ | ३.८६ |
नांदेड | ४.२८ | १.९३ |
यवतमाळ | १३.५८ | ४.१९ |
दुसरा टप्पा | ||
हिंगोली | २९.३४ | ४.३७ |
नंदुरबार | २९.४३ | ३.३१ |
तिसरा टप्पा | ||
मुंबई उपनगर | १२.५१ | ५.२५ |
ठाणे | १९.२५ | ७.५४ |
नाशिक | १८.७१ | ७.७५ |
औरंगाबाद | २०.३४ | ५.३८ |
अकोला | ४३.०४ | ७.७४ |
अमरावती | २८.५९ | ६.५६ |
बीड | ४७.१४ | ८.४० |
भंडारा | ४.४१ | ७.६७ |
गडचिरोली | ५.९२ | ६.५१ |
उस्मानाबाद | ३१.०९ | ७.७० |
पालघर | ४८.९३ | ५.११ |
परभणी | १६.०२ | ७.१० |
सोलापूर | ४४.३९ | ६.७८ |
वर्धा | ४.०४ | ७.५७ |
वाशिम | १८.९० | ५.१९ |
चौथा टप्पा | ||
पुणे | २०.४५ | १३.६२ |
बुलडाणा | ७.७१ | १०.०३ |
कोल्हापूर | ७१.५० | १५.२५ |
रायगड | ३८.३० | १९.३२ |
रत्नागिरी | ५१.८१ | १६.४५ |
सांगली | ४७.९४ | १४.०१ |
सातारा | ६१.५५ | १५.६२ |
सिंधुदुर्ग | ६६.५६ | १२.७० |
चौथ्या टप्प्यात –पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
(Maharashtra government Unlock Order from 7 June)
संबंधित बातम्या :
Special Report | महाराष्ट्रात 1 लाखांहून जास्त कोरोनाबळी, मुंबईसह कोणत्या शहरात किती मृत्यू?
सीरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार, DGCI ची मान्यता