नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (शुक्रवार) नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे सकाळी साडेदहा वाजता नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगाव येथील आरोग्य केंद्रांची पाहणी करणार आहेत. (CM Uddhav Thackeray Nashik Nandurbar Tour to Visit Health Centers)
स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार
उद्धव ठाकरे यांचा दौरा नाशिकमधील ओझरहून सुरुवात होईल. तिथून ते नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगावला जातील. कोरोना लसीकरणाच्या संदर्भातील माहिती घेऊन उद्धव ठाकरे स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
वन विभागाच्या रोप वाटिकेला भेट
त्यानंतर सुरवानी येथे सुरु असलेल्या वीज वितरण उपकेंद्राच्या कामाची पाहणीही उद्धव ठाकरे यावेळी करणार आहेत. त्यानंतर धडगाव येथील रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणाच्या संदर्भातील माहिती घेऊन ते वन विभागाच्या रोप वाटिकेला भेट देणार आहेत. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील.
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक आणि नंदुरबार दौऱ्यात मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही सोबत असतील.
राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता मिळाली असून ३ ते ४ महिन्यांत प्राधान्य गटाला २ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. उन्हाळ्यामुळे लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत दिले. pic.twitter.com/4h4t3mz2FD(CM Uddhav Thackeray Nashik Nandurbar Tour to Visit Health Centers)
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 18, 2021
नंदुरबारमध्ये पावसामुळे ढगाळ वातावरण
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहाटे पाऊस पडल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणाचा त्यांच्या दौऱ्यावर काही परिणाम होतो का? हे अजून स्पष्ट झालले नाही. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येणार असल्यामुळे त्यांचा नियोजित दौरा ढगाळ वातावरणातही होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रशासनाकडून मात्र नियोजित वेळेप्रमाणे दौरा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
(CM Uddhav Thackeray Nashik Nandurbar Tour to Visit Health Centers)