Nitesh Rane : “सोनिया गांधींपुढे झुकल्यामुळेच उद्धव ठाकरेंची मान दुखते, ते स्टेरॉईड घेऊन बोलतात”, नितेश राणेंचा पलटवार

गेल्या अडीच वर्षात शिवसेनेने सत्तेसाठी हिंदूत्व सोडल्याची टीका वारंवार भाजप करत आहे. आता पुन्हा हिंदूत्व आणि हनुमान चालीसा यावरून राजकारण तापलं आहे. हिंदुत्वावरून विरोधकांना सुनावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर काही वेळातच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Nitesh Rane : सोनिया गांधींपुढे झुकल्यामुळेच उद्धव ठाकरेंची मान दुखते, ते स्टेरॉईड घेऊन बोलतात, नितेश राणेंचा पलटवार
उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणार? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार? सभेआधी नितेश राणेंचे 4 सवालImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:43 PM

मुंबई : मुंबईतल्या बेस्टच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी चौफेर बॅटिंग करत पुन्हा विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. हिंदुत्वावरून विरोधकांवर निशाणा घंटाधारी लोकांनी गदाधारी लोकांना शिकवू नये, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधलाय. तर तुमची संस्कृती असेल तर या घरात पण नीट या, दादागिरी करुन याल तर मोडून काढू, असा थेट इशारा त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना आणि त्यांच्यावरून होणाऱ्या टीकेवरूनही दिला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर भाजप नेत्यांच्याही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. गेल्या अडीच वर्षात शिवसेनेने सत्तेसाठी हिंदूत्व सोडल्याची टीका वारंवार भाजप करत आहे. आता पुन्हा हिंदूत्व आणि हनुमान चालीसा यावरून राजकारण तापलं आहे. हिंदुत्वावरून विरोधकांना सुनावणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर काही वेळातच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

यांचं नवं हिंदुत्व ते किती मानतात , ते यांच्या कृतीतून दिसलं. उद्धव ठाकरेंनी नवं हिंदुत्वाची भाषा करायची विसरावी, त्यांनी स्वतःला सेक्युलर म्हणायला सुरू करावं , घाबरतात कशाला ? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या समोर झुकताय म्हणून तर मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. नवं हिंदुत्व सोडून द्या , तुमच्या तोंडी ते शोभत नाही, तसेच चला आता सोडा त्या उद्धव ठाकरेंना ते स्टेरॉइड घेऊन बोलतात, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंचं आव्हान

तसेच मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यालाही त्यांनी उत्तर दिलंय. “चल दाखव, तुझे पोलीस हटव,,आणि दादागिरी करायला रस्त्यावर उत्तर. पोलीस 24 तास तुझ्या आजूबाजूची हटव , तुझ्या दोन्ही पोरांना घेऊन स्वतः रस्त्यावर खाली उतर, बंगल्यात बसू नकोस” असा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली आहे. तर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबाबतही त्यांनी पुन्हा भाष्य केले आहे. आता बदल झालाच पाहिजे. आत मध्ये छळ सुरू आहे. मलाही कोल्हापुरात इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. खार पोलीस स्टेशनला पोलीस रात्री घेऊन गेले, मग संताक्रूजला. त्यांना साधा पंखा दिला नाही, कालपासून रुग्णालयात नेण्यास बोलतात, तरीही त्यांना जेजे मध्ये घेऊन जात नाहीत, त्यांची तपासणी होऊ देत नाहीत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

Ajit Pawar : ‘मातोश्री’बाहेरच हनुमान चालिसा म्हणण्याचा अट्टाहास का? अजित पवारांचा सवाल; भाजपवर घणाघात

Sadabhau Khot : “अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशातला नाच्या”, सदाभाऊ खोतांची मिटकरींवर जहरी टीका

Hanuman Chalisa Row : घरी यायचे असेल तर जरुर या, सांगून या, राणा जोडप्याच्या हनुमान चालीसा आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.