आज मी तिथे नसलो, तरी आपण सर्व एकत्र आहोत, मुख्यमंत्र्यांकडून बाळांच्या मातांना धीर

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

आज मी तिथे नसलो, तरी आपण सर्व एकत्र आहोत, मुख्यमंत्र्यांकडून बाळांच्या मातांना धीर
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 12:59 PM

मुंबई : “आज मी तिथे नसलो तरी आपण सर्व एकत्र आहोत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray On Bhandara Hospital Fire) यांनी भंडाऱ्यात घडलेल्या घटनेत मृत्यू झालेल्या बाळांच्या माता आणि नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे (CM Uddhav Thackeray On Bhandara Hospital Fire).

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

भंडाऱ्यामध्ये जे घडले ते योग्य नाही : मुख्यमंत्री

“आज मी येथे उपस्थित नसलो तरी, आपण सर्व एकत्र आहोत. भंडाऱ्यामध्ये जे घडले ते योग्य नाही. काल रात्री त्या घटनेबद्दल मला समजले. मी काल त्या भागात होतो”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

“काल गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. तेव्हा तेथिल स्थानिकांची मागणी होती हा प्रकल्प लवकर पूर्ण करा. येथे पंजाब सारखी हरित क्राती येथे होईल. परंतु माझ्या मनात संमिश्र प्रतिक्रिया होती. आज पंजाब मधील शेतकरी आंदोलन करत आहेत. आपण शेतकऱ्यांसाठी हे सर्व करु, परंतु कायदे करुन त्या सर्वांवर पाणी फिरु नये”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चौकशीचे आदेश

“भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच संध्याकाळी 5 वाजता आरोग्यमंत्री स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य बाळांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेत 3 बाळांचा होरपळून तर 7 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे (CM Uddhav Thackeray On Bhandara Hospital Fire).

CM Uddhav Thackeray On Bhandara Hospital Fire

संबंधित बातम्या :

Bhandara Hospital Fire | 10 नवजात बालकांचा मृत्यू, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.