Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन शब्द वापरु नका, काय उघडत जाणार त्याची यादी देईन, पण एक अट : मुख्यमंत्री

लॉकडाऊन अचानक लावणं हे जसं योग्य नाही. तसं ते अचानक उठवणं योग्य नाही," असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray On Lockdown 4.0) म्हणाले. 

लॉकडाऊन शब्द वापरु नका, काय उघडत जाणार त्याची यादी देईन, पण एक अट : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 3:18 PM

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 31 मे नंतर लॉकडाऊन उठवणार का? या प्रश्नाचे उत्तर दिले. राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर लॉकडाऊन उठणार की राहणार हा इतका विषय नाही. सुरुवातीला हळूहळू एक एक गोष्ट बंद करत गेलो. अचानक लॉकडाऊन करणं आणि अचानक लॉकडाऊन उठवणं म्हणजे एका पायावर कुऱ्हाड मारली आणि दुसऱ्याही पायावर मार, तसं करायचं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray On Lockdown 4.0)

“आपण लॉकडाऊनच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहोत. लॉकडाऊन अचानक लावणं हे जसं योग्य नाही. तसं ते अचानक उठवणं योग्य नाही,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“लॉकडाऊन हा शब्द वापरु नका, तो शब्द बाजूला ठेवा. त्यापेक्षा आपण हळूहळू आपल्या जीवनाची गाडी पूर्वपदावर आणतो आहे. म्हणजे जसं हळूहळू बंद करत गेलो. तसं पुन्हा परत सुरु करत आहोत. हे सुरु करत असताना पावलं अत्यंत खबरदारीने टाकायची आहेत,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“लॉकडाऊन हळहळू उठवायला लागलो आहे. उद्योगधंदे सुरु झालेत, मजूर काम करतात. मुंबईतही काही गोष्टी सुरु करतोय. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा. हळूहळू आपण काय उघडत जाणार याची यादी मी आपल्याला देत जाईन. मात्र माझी एक अट राहणार आहे. सरकारने परवानगी दिल्यानंतर जर गर्दी झाली तर परत बंद करावे लागेल.”

“त्यामुळे अजिबात गर्दी करायची नाही, सर्वांना सगळं मिळणार, अगदी एखादी गोष्ट उघडली तर झुंबड होता कामा नये. एकदा उघडलं की पुन्हा बंद होऊ नये याची खबरदारी सरकारने आणि सरकारपेक्षा तुम्ही घ्यायची आहे. अंतर ठेवा, रांग लावा. जे काही आपलं आयुष्य सुरळीत सुरु होतं ते असंच सुरु ठेवा,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. (CM Uddhav Thackeray On Lockdown 4.0)

कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे पुढचे काही दिवस आपल्याला मास्क घालूनच समाजात वावरायचं आहे. हात सतत धुवत राहावे लागेल. सॅनिटायझर हा हवाच. एकमेकांपासून अंतर राखणे, रस्त्यावर थुंकू नये. कोरोनानंतरचे जग हे असचं असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कोरोना विषाणू जोरात गुणाकार करतोय. येत्या दिवसात आणखी काही केसेस वाढणार आहे. त्यासाठी फिल्ड हॉस्पिटलची इतरत्र सोय करतोय. डॉक्टर, नर्सेस जीवनावश्यक सेवेसाठी जो कर्मचारी वर्ग आहे. त्याने अजिबात काळजी करु नका. तुमच्या सर्वांची जबाबदारी घ्यायला महाराष्ट्र सरकार समर्थ आहे. कोणीही आपली काम सोडून जाऊ नका. अनेक कोविड योद्धा मदतीला येत आहे, असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना केले. (CM Uddhav Thackeray On Lockdown 4.0)

संबंधित बातम्या : 

पॅकेज घोषित कशाला करत बसायचं? थेट मदत करायची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...