Bakrid 2020 | चार महिन्यात सर्व सण साधेपणाने झाले, बकरी ईदही साधेपणाने करु, पुढच्या वर्षी जल्लोष करु : मुख्यमंत्री
मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी," असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं (CM Uddhav Thackeray On Bakri Eid 2020 Celebration) आहे.
मुंबई : “वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली, लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापणा न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बकरी ईदबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलं. मुस्लीम धर्मीयांचा महत्त्वाचा सण बकरी ईदला कुर्बानीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. (CM Uddhav Thackeray On Bakri Eid 2020 Celebration)
“गेल्या 4 महिन्यात सर्व सण सर्व समाज घटकांनी घरात साजरे केले. त्यामुळं मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मुख्यमंत्री म्हणाले, “वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली. लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापणा न करता आरोगयोत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. हा कोरोना व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच काम नये. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत, किंबहुना नियंत्रित प्रमाणात उघडल्या आहेत. जुलै अखेरीस कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. ऑगस्टपासून जर हा आलेख वर गेला तर नियंत्रण कठीण होईल. कारण सर्व ताण काम करणाऱ्या यंत्रणांवर आहे”.
मटण शॉप्स किंवा ऑनलाईन ऑर्डर
मटण शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर घेता येईल. गेल्या 4 महिन्यात सर्व सण सर्व समाज घटकांनी घरात साजरे केले. त्यामुळं मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
लोकांनी गर्दी टाळावी आणि संसर्ग वाढेल अशी कुठलीही कृती टाळावी. नेत्यांची जबाबदारी समाजाला दिशा दाखवणं आहे. त्यामुळे आपण लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करावेत. सण दरवर्षी येतात, मात्र 2020 हे वर्ष कॅलेंडरमधून काढून टाकू. पुढच्या वर्षीपासून आणखी जोशात सण साजरा करण्यासाठी चांगलं आरोग्य लाभू अशी प्रार्थना करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray On Bakri Eid 2020 Celebration)
संबंधित बातम्या :
मुंबई लोकल ऑगस्टमध्ये सुरु करण्याचा केंद्राचा विचार : पालकमंत्री अस्लम शेख