मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद, उद्धव ठाकरे 5 मोठ्या घोषणा करण्याची शक्यता
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, औरंगाबाद या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. त्यातच आज पुण्यात मिनी लॉकडाऊन (Pune Lockdown) करण्यात आला.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात उद्भवलेली कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनची (Maharashtra second lockdown) शक्यता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, औरंगाबाद या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. त्यातच आज पुण्यात मिनी लॉकडाऊन (Pune Lockdown) करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबई आणि महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य करतील. (CM Uddhav Thackeray to address state today may make big announcement about Maharashtra second lockdown, Mumbai local train, lockdown guidelines)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री संवाद साधणार आहेत. त्यावेळी ते महाराष्ट्रातील निर्बंधावर भाष्य करु शकतात. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच्या टास्क फोर्सच्या बैठकीत दिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन नसेल, पण निर्बंध कडक लावले जातील, असं ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून सांगितलं जात आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही राज्यात अंशत: लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली आहे. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल बंद होणार नाही पण प्रवाशांच्या विभाजनाचा विचार सुरु असल्याचं सांगितलं. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
टास्क फोर्सची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व विभागांचे मुख्य सचिव, कोविड १९ संसर्ग टास्क फोर्सचे (Task Force) वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील सद्यस्थिती, लॉकडाऊन, निर्बंध याबाबत मोठा निर्णय अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री कोणत्या घोषणा करु शकतात?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील निर्बंधाबाबत घोषणा करु शकतात. कोणत्या जिल्ह्यात काय निर्बंध असू शकतात याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जिल्हानिहाय ऐवजी राज्यासाठी करण्यात येत असल्याच्या उपाययोजना सांगतील.
- महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या रात्रीच्या जमावबंदीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. सध्या रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी आहे. हा वेळ वाढवून पुण्याप्रमाणे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू शकते
- पुण्यात ज्याप्रमाणे दिवसा जमावबंदी आहे, त्याप्रमाणेच मुंबईसह महाराष्ट्र किंवा कोरोनाचा उद्रेक असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा जमावबंदी लागू होऊ शकते.
- याशिवाय सर्व धार्मिक स्थळं काही दिवस पुन्हा बंद ठेवण्याची शक्यता आहे .
- पुण्यात ज्याप्रमाणे बससेवा 7 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे, त्याप्रमाणे मुंबई लोकलमधील प्रवाशांवर निर्बंध येऊ शकतात. त्याबाबत मुख्यमंत्री बोलतील.
- मुंबईसह राज्यातील मॉल काही दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा होऊ शकते
- राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा सुरु राहण्याची शक्यता आहे.
- सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. त्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचा आवाहन मुख्यमंत्री करु शकतात.
संबंधित बातम्या
राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री आज रात्री संवाद साधणार
Pune lockdown update : मोठी बातमी : पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद