शिवसेनेची मोर्चेबांधणी, CM Uddhav Thackeray खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी आज संवाद साधणार
पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व खासदारांशी संवाद साधला होता. दोन वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मुंबई: पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व खासदारांशी संवाद साधला होता. दोन वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (bjp) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्या खासदारांशी संवाद साधल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही (shivsena) लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने शिव संपर्क अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पूर्व आणि पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुख पक्ष बांधणी करणार आहेत. मंगळवारपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होणार असल्याने या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवन येथे शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शिव संपर्क अभियानाच्या मार्फत शिवसेना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत राज्यात शिवसेना करत असलेल्या विकास कामांची माहीती पोहचवणार आहे. शिवसेनेच्या या शिव संपर्क अभियानात सहभागी असणाऱ्या खासदारांना आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, विनायक राऊत तसेच मुंबईतील इतर खासदार शिवसेना भवनात उपस्थित रहाणार आहेत.
असं असेल शिवसंपर्क अभियान
राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनते पर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं “शिव संपर्क अभियान” सुरू केलंय. या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात सुरू होणार आहे. या 19 जिल्ह्यात शिवसेनेचे 19 खासदार शिव संपर्क अभियान सुरू करणार आहेत. पहिल्या टप्यातील 19 जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्या सोबत शिवसेना पदाधिकार्यांची 12 जनांची टीम कार्यरत असणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी संजीवनी ठरणार?
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या निवडणुका सहा महिन्यात घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानामुळे शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांना राज्यभरात पोहोचता येणार आहे. त्यानिमित्ताने शिवसैनिकांमधील मरगळही दूर करण्यास मदत होणार आहे. शिवाय राज्य सरकारवर सातत्याने सातत्याने आरोप होत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधून हा संभ्रमही दूर करता येणार असल्याचं सांगितलं जातं.
राऊतही विदर्भ दौऱ्यावर
नागपूर मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. उद्या रात्री ते नागपूरला जायला निघणार आहेत. 22 ते 24 मार्च रोजी ते नागपूर दौऱ्यावर असतील. 22 तारखेला नागपूर शहरात संघटन बांधणीबाबात आढावा बैठका घेणार आहेत. 23 आणि 24 नागपूर ग्रामीणच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. तर 22 तारखेला संजय राऊत नागपूरात पत्रकार परिषद घेणार आहेत.
संबंधित बातम्या:
समुपदेशन किटमध्ये चक्क रबरी लिंग, आशा वर्करांसमोर पेच; Chitra Wagh यांची राज्यसरकारवर सडकून टीका
ज्या दिवशी शिवसेना Congressबरोबर सत्तेत बसली त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली, श्वेता महालेंची टीका
Nashik | मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांमध्ये ऐनवेळी बदल; आता जूनमध्ये आयोजन, कारण काय?