Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांनी कालपर्यंत समाजावलं आज थेट सुनावलं, प्रेमसंवाद ते वाघाची डरकाळी, बदलेली बॉडी लॅन्ग्वेज काय सांगते?
तुम्ही शिवसेनेच्या नावाशिवाय आणि माझ्या फोटोशिवाय जगून दाखवा असा कडकडीत इशारा मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दिला. सुरूवातील प्रेमाने समजानं ते आज थेट सुनावणं, मुख्यमंत्र्यांच्या याच बदललेल्य बॉडि लॅन्ग्वेजची सध्या जास्त चर्चा आहे.
मुंबई : दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेत (Shivsena) पाचवं बंड झालं आणि थेट महाराष्ट्राचं सरकारचं अस्थिर झालं. राज्यात राजकारण हे घाटातल्या वळणांपेक्षाही जास्त वळणं घेऊ लागलं. शिवसेनेला खिंडार पडत असल्याचे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) दोन दिवसांपूर्वी लाईव्ह आले आणि त्यांनी शांत, संयमी मार्गाने बंडखोरांना सजावण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्यातील जनतेशीही संवाद साधल. त्या परिणामही काही मिनिटात दिसून लागला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा ते मतोश्री प्रवासात फुलांचा वर्षाव झाला. शासकीय बंगला सोडताना आतापर्यंत क्वचित एखाद्या मुख्यमंत्र्याला अशी साथ मिळाली असेल. त्यानंतर गेल्या दोन दिवसात अनेक घडामोडी घडल्या. तिकडून शिंदेही (Eknath Shinde) ठाकरेंना थेट आव्हान देऊ लागले. मात्र आज जेव्हा मुख्यमंत्री लाईव्ह आले. तेव्हा त्यांनी थेट डरकाळी फोडली. तुम्ही शिवसेनेच्या नावाशिवाय आणि माझ्या फोटोशिवाय जगून दाखवा असा कडकडीत इशारा मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दिला. सुरूवातील प्रेमाने समजानं ते आज थेट सुनावणं, मुख्यमंत्र्यांच्या याच बदललेल्य बॉडि लॅन्ग्वेजची सध्या जास्त चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंना काय कमी केलं?
तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्याही यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवल्या आहेत. एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनाकडून खासदार आहे, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना ज्या गोष्टी दिल्याचा त्याचा हिशोबही सर्वांसमोर मांडला. तसेच ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना थेट सुनावलं आहे.
संजय राठोड यांनाही सुनावलं
तसेच माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, तुम्ही झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही. हे सारं भाजपने केलं आहे, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल, असे म्हणत त्यांनी यावेळी भाजपलाही थेट इशारा दिला आहे. तर तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यांनी फक्त एकनाथ शिंदेच नाही तर राठोडांचाही यावेळी खरपूस समाचार घेतला आहे. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं? असं विचारता, मात्र संजय राठोडांवर अनेक आरोप झाले, त्या काळातही मी त्यांना सांभाळून घेतलं, असे म्हणत त्यांनी संजय राठोड यांनाही सुनावलं आहे. तर बाळासाहेबांचं माझ्याहूनही लाडकं आपत्य म्हणजे शिवसेना, ज्या शिवसेनेसाठी जीवही देईल असं जे म्हणायचे, तेच आज पळून गेले, असे म्हणत त्यांनी बंडखोरांवर हल्लाबोल चढवला आहे.