मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अमरावती, औरंगाबाद दौऱ्यावर; समृद्धी महामार्गाची पाहणी करणार
या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हा प्रवास अवघ्या सहा तासांत करणे शक्य होणार आहे. | CM Uddhav Thackeray
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करतील. याशिवाय, मुख्यमंत्री दोन्ही जिल्ह्यातील इतर महामार्गाच्या कामांचाही आढावा घेतील. (CM Thackeray will visit Mumbai Nagpur Samruddhi highway corridor)
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. एकूण 710 किलोमीटरच्या या द्रुतगती महामार्गासाठी जवळपास 56 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हा प्रवास अवघ्या सहा तासांत करणे शक्य होणार आहे.
१२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यांतील आणि २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.
कसा असले मुख्यमंत्र्यांचा दौरा?
* सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन. * हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण. * 11.15 वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव * दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण. * दुपारी 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव. * दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण. औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण
समृद्धी महामार्ग लवकरच वाहतुकीसाठी होणार खुला
ऑक्टोबर महिन्यापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे 60 टक्के काम पूर्ण झाले होते. जिल्ह्यातील फतियाबाद ते वैजापूर तालुक्यातील सुराळ्यापर्यंत ६० टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्या मे अखेरपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली होती.
संबंधित बातम्या:
Devendra Fadnavis | बाळासाहेबांचं नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचं काम जोमात : देवेंद्र फडणवीस
Samruddhi Highway | समृद्धी महामार्गाचे काम 40 टक्के पूर्ण
(CM Thackeray will visit Mumbai Nagpur Samruddhi highway corridor)