विधानसभेत उद्धव ठाकरेंचे एकाचवेळी चौकार, षटकार, गुगली आणि यॉर्कर !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला (CM Uddhav Thackerays answers Governor speech) उत्तर देताना विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला केला.

विधानसभेत उद्धव ठाकरेंचे एकाचवेळी चौकार, षटकार, गुगली आणि यॉर्कर !
Follow us
| Updated on: Dec 19, 2019 | 1:18 PM

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला (CM Uddhav Thackerays answers Governor speech) उत्तर देताना विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष टीकेचे बाण सोडलेच, पण ठिकठिकाणी शालजोडेही लगावले. भाजपला टार्गेट करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं.  (CM Uddhav Thackerays answers Governor speech)

“आमच्या सरकारने असं ठरवलंय की कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं. आमचं सरकार गरिबांचं, सर्वसामान्यांचं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले हे तीन पक्षांचं तीन चाकी सरकार आहे. हे रिक्षा सरकार आहे. मात्र देवेंद्रजी आमचं गरिबांचं सरकार आहे, गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

तुकडोजी महाराजांच्या शब्दात सांगायचं, तर..

पाहून सौख्य माझे, सॉरी… देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या, असं  उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्या माहितीप्रमाणे राज्यपालांनी पहिल्यांदाच राज्यपालांनी मराठीत भाषण केलं. मराठीत भाषण केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या सरकारने असं ठरवलं आहे, कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं. आमचं सरकार गरिबांचं, साधं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बुलेट ट्रेनपेक्षा गरिबांची रिक्षा बरी

गरीब सरकार तीन चाकी रिक्षाचे हे मान्य. गरीब सरकारला बुलेट ट्रेन परवडत नाही. कमी बोलावं आणि जास्त काम करावं ही आमच्या साधू संताची शिकवण आहे. आमचं सरकार साऱ्या गरिबांचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सुधीरभाऊ नका होऊ अधीर

धर्माच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांकडून गाडगेबाबांचा संदर्भ. गाडगेबाबा म्हणायचे, धर्म सांगायचा नसतो, जगायचा असतो. गाडगेबाबा म्हणायचे, धर्म ग्रंथांत नसतो, जीवनात असतो. गाडगेबाबांचा उपदेश मंत्रालयात बोर्डवर लावणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

धर्म ही सांगायची नाही तर जगायची गोष्ट असं गाडेगेबाबा म्हणायचे. गती, प्रगती की अधोगती या शब्दांचा खेळ मला जमत नाही. मुनगंटीवारांना मी सांगणार आहे की सुधीर नका होऊ अधीर, म्हणून तुम्हाला वाटतं अजब आमचं सरकार – उद्धव ठाकरे

गती,प्रगती,अधोगतीत पडणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवारांना टोले लगावले. सुधीर नका होऊ अधीर, असं उद्धव ठाकरे म्हणाले. झालात तुम्ही बेकार, म्हणून वाटते आमचं अजब सरकार, असा टोला उद्धव यांनी लगावला.

शेतकऱ्यांना साले म्हणाणाऱ्यांनी शिकवू नये

शेतकऱ्यांचा पुळका तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि पाळणार. शेतकऱ्यांना रडतात साले म्हणायचे. भाजपला शेतकऱ्यांचा पुळका कसा काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

दिलेल्या शब्दांचं कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झालं? वडfलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल, मी त्या थराला गेलो आणि ते करुन दाखवलं. मी काही भाजपची कायम पालखी वाहणार नाही, हा शब्दही बाळासाहेबांना दिला नव्हता. बाळासाहेबांना शब्द दिलाय, भाजपची पालखी कायम वाहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपचे ओझे वाहणार नाही

भाजपचे ओझे आता आम्ही उतरवून टाकू. चहापेक्षा किटली गरम असं कुणीतरी म्हणाले. मात्र किटली पुसणारे फडके पण गरम होऊ लागले आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

जो सामना दाखवला त्यात मोदींचंही कौतक होतं. पण जे सोईचं तेच दाखवलं. दै.सामनातील मोदींचे ‘कौतुक’ का दाखवत नाही? मोदी तर म्हणतात पवार माझे गुरु. मोदींबरोबर फडणवीसांचे पटत नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मी पवार साहेबांचं बोट धरुन राजकारणात आलो होतो हे कोण म्हणाले होतं? अर्थशात्र मला जास्त समजत नाही त्यासाठी मला देवेंद्रजी शिकवणी लावायची आहे. नया है वहसारखी माझी परिस्थिती आहे. मी शिकतोय. मला फडणवीसांकडून शिकायचं आहे, मस्करी नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती लवकरच बाहेर येईल.  MMRDA चं कर्ज महाराष्ट्राचं नाही म्हणतात फडणवीस. MMRDA चं कर्ज बुडवलं तरी ते राज्याच्याच बोकांडीवर येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी राज्याची बदनामी होऊ देणार नाही, होणार नाही. मला भिती वाटतेय की राज्यपाल विचारतील की काय अभिभाषणावर बोलल्यावर हक्कभंग य़ेतो काय? गोवर्धन उचलण्यासाठी सगळे आपआपल्या परिने प्रयत्न करु.  विरोधक अभिभाषण सोडून दुसरेच बोलले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

उद्योगमंत्री राज्याच्या धोरणाला कसा जबाबदार? एकीकडे देसाई, पण दुसरीकडे कसाई. 14-15 लाख कोटींचे MoU झाले म्हणाले, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोले लगावले.

नोटबंदी आणि GST यामुळे आलेले अनेक उद्योगधंदे, उद्योजक आल्या पावली परत गेले. देशाची आर्थिक परिस्थिती कोमात जात असेल तर ही शरमेची गोष्ट आहे. मोदी-फडणवीसामुळं चांगले उद्योगी वातावरण होते. पण नोटबंदी आणि GST मुळे गुंतवणूक परत गेली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, अर्थव्यवस्था कोमात जाईल. अर्थव्यवस्था कोमात जाणे मलाही वाईटच असेल. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सोबत या. आपण शेतक-यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करु, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

हे जनादेशाचं सरकार नाही असं तुम्ही म्हणालात, पण शेवटी हे राजकारण आहे. भारत जलाओ पार्टी म्हणणा-या रामविलास पासवानांसोबत तुम्ही गेलात. आमचं सरकार त्रिशंकू नाही,मनाने एकत्र आलेलो आहोत, काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे, हे महाराष्ट्राच वैभव आहे, हे गोरगरीबांचं सरकार असं उद्धव यांनी सांगितलं.

शेतकरी संपावर गेल्यावर काही फरक पडत नाही असं कोण म्हणालं होतं? शेतक-यांची आत्महत्या ही फॅशन झालीय असं कोण म्हणालं होतं? कालच्या तुमच्या भारूडात जे मूग आले होते ते मूग बाबरीच्या वेळी गिळून गप्प बसले होते ते का? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली.

जर आज संत ज्ञानदेव असते तर काय म्हणाले असते? अच्छे दिन येईचीना, 15 लाख मिळेचीना,  बेरोजगारी जाईचीना, काळा पैसा येईचीना असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी केली.

बेळगाव पाकिस्तानात आहे का?

बेळगावच्या महाराष्ट्रातील लोकांवर अत्याचार होतोय. कर्नाटकव्याप्त हा मी आणलेला नवीन शब्द आहे. तो भूभाग महाराष्ट्रात आणला पाहिजे. बेळगाव कारवार पाकिस्तानात आहे का?

 सावरकरांवरुन फटकेबाजी

शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मिरचे हिंदू सगळीकडे स्थिरावले. सावरकर मनात असू द्या. सावरकर म्हणजे काय हे दुसऱ्यांना समजून सांगाण्याऐवजी आपण समजून घेऊया. माझ्या महाराष्ट्रात गाय माता आणि बाजूला जाऊन खाता? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गोवंश हत्याबंदीवरुन भाजपवर जोरदार प्रहार केला.

सावरकर कोण शिकवतंय? सावरकर कळलेत का? एकमेकांचे कपडे फाडण्यापेक्षा, एकमेकांवर चिखल फेकण्यापेक्षा सावरकर समजून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

तुम्ही बाळासाहेबांच्या नावे मतं मागितली

जनादेशात 50-50 हे जाहिर केल होते हे विसरु नका. मोदी-शहांच्या नावे शिवसेनेने मते मागितली असं म्हणता, मग तुमच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो नव्हता का? तुम्ही बाळासाहेबांच्या नावे मतं मागितली असं मी म्हणू का? असंही उद्धव म्हणाले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.