कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं, जूनमध्ये शाळा-कॉलेज सुरु करण्याचा विचार : मुख्यमंत्री

आमची कोरोनासोबत जगायची तयारी आहे, पण त्याची तयारी आहे का आम्हाला जगू द्यायची," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  (CM Uddhav Thackery on re-opening School College)

कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी संपावयाचं, जूनमध्ये शाळा-कॉलेज सुरु करण्याचा विचार : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 10:01 PM

मुंबई : महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मला महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट मला पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  (CM Uddhav Thackery on re-opening School College)

“जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्ष. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की हे संकंट पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे त्यापूर्वी संपवायला पाहिजे. जून महिना सुरु केल्यानंतर शाळा कॉलेज सर्व सुरु करायचं,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरु होणार, काहींच्या परीक्षा राहिल्या आहे. शैक्षणिक वर्ष कसं सुरु करणार, शाळा कशा सुरु करणार, परीक्षा कशा होणार, ऑनलाईन सुरु करणार की प्रत्यक्ष शाळा सुरु करणार, हे सर्व मोठे विषय आहेत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  (CM Uddhav Thackery on re-opening School College)

“मला कोणत्याही परिस्थिती शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही. ते वाया जाऊ देऊ शकत नाही. त्यामुळे शाळा कशा सुरु करायचं, त्याच्या खबरदारी काय घ्यायची. शाळा, कॉलेजमध्ये अॅडमिशन करायच्या. कुठे काय करायचं याचा विचार सुरु आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“कोरोनासोबत जगायला शिका असं म्हटलं जात आहे. आमची कोरोनासोबत जगायची तयारी आहे, पण त्याची तयारी आहे का आम्हाला जगू द्यायची,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  (CM Uddhav Thackery on re-opening School College)

“राज्यात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. परप्रांतिय मजूर गावी गेले आहेत, जर मजुरांचा तुटवडा जाणवत असेल तर महाराष्ट्राला आत्मनिर्भर करण्यासाठी भूमिपुत्रांनी समोर यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच त्यांनी कोरोनाचं हे संकट पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे, असा निर्धारही बोलून दाखवला. मात्र त्याचवेळी त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला कळकळीची विनंती केली .”

मला कोविड योद्धा हवे- उद्धव ठाकरे

“मला अजूनही कोविड योद्धा हवे आहेत, पोलीस थकतात, आजारी पडतात, गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दोन पोलीस शहीद झालेत. डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्या त्या वेळी विश्रांती देणे गरजेचे आहे, त्यामुळे मला कोव्हिड योद्ध्यांची गरज आहे, ज्यांना कुणाला मदतीला यायचं आहे त्यांचं स्वागत आहे.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

भूमिपुत्रांनी पुढे या, आपला महाराष्ट्र आपल्या पायावर उभा करु – मुख्यमंत्री

मुंबई-पुण्यातून कोकणात, प. महाराष्ट्रात जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.