Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मनपाचे कौतुक, पावसाचा जोर वाढल्याने काय दिल्या सूचना?

पाऊस आला की जागोजागी पाण्याचा साठा. यामुळे वाहतुक कोंडीपासून ते पायी मार्गस्थ होणेही जिकिरीचे होत होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई मनपाने मोठा बदल करुन पाणी साचणार नाही यासाठी जागोजागी पंप उभारले आहेत. शिवाय पावसाळा सुरु होण्यापूर्वी जी कामे होत आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यातला धोका टळत आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मनपाचे कौतुक, पावसाचा जोर वाढल्याने काय दिल्या सूचना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 6:10 PM

मुंबई : राजकारण काही का असेना पण केलेल्या कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. सोमवारी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिध्द केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी वाढत्या पावसाच्या जोरामुळे (Mumbai MNP) मुंबई मनपाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांना आढावा घ्यावा लागला. दरम्यान, मुंबई मनपा प्रशासनाने (Heavy Rain) पावसाळ्याच्या तोंडावर योग्य नियोजन केलेले आहे. शहरातील वॉटर लॉगिंगच्या स्पॉटची संख्या ही कमी झालेली आहे. 299 ठिकाणी हे स्पॉट आहेत. तर हिंदमाता परिसरात पाऊस झाला की पाणी साचते अशी परस्थिती असायची पण आता या भागात देखील पाणी साचत नाही. तर इतर भागात वाहतूक सुरळीत आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला तरी मुंबई थांबलेली नाही म्हणत शिंदे यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

यंदा मुंबईची तुंबई होणार नाही

पाऊस आला की जागोजागी पाण्याचा साठा. यामुळे वाहतुक कोंडीपासून ते पायी मार्गस्थ होणेही जिकिरीचे होत होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई मनपाने मोठा बदल करुन पाणी साचणार नाही यासाठी जागोजागी पंप उभारले आहेत. शिवाय पावसाळा सुरु होण्यापूर्वी जी कामे होत आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यातला धोका टळत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढून देखील कुठे वाहतूक कोंडी झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा दरम्यान सांगितले.

गरज भासेल तिथे धावून येणार बेस्ट

मुंबईमध्ये अशी 25 ठिकाणे आहेत जिथे थोडा जरी पाऊस झाला तर रेल्वे वाहतूक ठप्प होते. त्यामुळे नागरिकांना अधिकचे पैसे देऊन घर जवळ करावे लागते. शिवाय ओढावलेल्या स्थितीचाही रिक्षाचालक, टॅक्सीधारक गैरफायदा घेऊन अधिकचे पैसे घेतात. त्यामुळे अशा ठिकाणी महापालिकेच्या बेस्टची सोय करणे महत्वाचे आहे. जेणेकरुन नागरिकांची गैरसोय होणार नाही. शिवाय त्यांना अधिकचे पैसेही खर्ची करावे लागणार नाहीत. एवढेच नाही तर अशा ठिकाणी नागरिकांसाठी चहा, पाणी नाष्ट्याची सोय करण्याच्या देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबईतील कामावर जाणाऱ्या प्रत्येकाचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ह्या महत्वाच्या ठरणार आहेत. रेल्वे वाहतूक बंद होताच नागरिकांना टॅक्सी किंवा रिक्षाचा आधार हा घ्यावाच लागतो पण आता याठिकाणी बेस्टे किंवा एसटी पोहचणार आहे. त्यामुळे आहे त्या दरातच नागरिकांना घर जवळ करता येणार आहे. कामावर जाणारा नागरिक थोडाच अधिकचे पैसे घेऊन कामावर जातो. या साधारण: बाबींचा विचार करुन शिंदे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन झाले तर सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.

Non Stop LIVE Update
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...