सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा मार्च 2021 नंतरच, सहकार मंत्र्यांची माहिती

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा मार्च 2021 नंतरच, सहकार मंत्र्यांची माहिती
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 11:23 AM

कराड : राज्यातील सहकार संस्थांच्या निवडणुका (Co-operative society Elections) आता मार्च 2021 नंतर होणार, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. कराडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांच्या नवीन कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब पाटील बोलत होते. (Co-operative society Elections to be held after March 2021 Co-operative Minister Balasaheb Patil announces)

राज्यातील 30 हजार 820 सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने हळूहळू तयारी सुरु केल्याची माहिती आहे. टप्प्याटप्प्याने या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 5 हजार 629 जणांचं पॅनलही मंजूर करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र मार्च 2021 नंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण तापणार आहे.

राज्यात एकूण 45 हजार 276 सहकारी संस्थांची निवडणूक बाकी आहे. त्यापैकी क आणि ड वर्गातील 30 हजार 820 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाची तयारी सुरु आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका 4 वेळा पुढे ढकलल्या!

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 17 मार्चला पुन्हा 3 महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला. पुढे अजून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता नव्या वर्षात या निवडणुका पार पडतील.

प्राधिकरणाकडून पॅनल तयार

क आणि ड वर्गातील 30 हजार 820 सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडून 5 हजार 629 जणांचं पॅनल तयार करण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये तज्ज्ञ व्यक्ती, निवृत्त सरकारी अधिकारी, खासगी लेखापरीक्षक, वकील यांसारख्या मंडळींचा समावेश करण्यात आल्याची माहितीही प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

सहकारी संस्थांना दिलासा

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यातील सहकारी संस्थांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लेखा परीक्षणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च 2021 पर्यंत तर लेखा परीक्षण 31 डिसेंबर 2020 पर्यंत करता येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यासंदर्भात आदेश काढला होता. (Co-operative society Elections to be held after March 2021 Co-operative Minister Balasaheb Patil announces)

संबंधित बातम्या:

सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे राजकारण तापणार, 30 हजार 820 संस्थांची निवडणूक घेण्याची प्राधिकरणाची तयारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने जाहीर होणार; उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा

(Co-operative society Elections to be held after March 2021 Co-operative Minister Balasaheb Patil announces)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.