पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा मास्क विसरल्या, जिल्हाधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई
'नो मास्क, नो एन्ट्री' या राज्य सरकारच्या धोरणाचे उल्लंघन याअंतर्गत ही कारवाई केल्याने जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात सतर्कतेचे संकेत दिले आहेत.
पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठकीत मास्क न घातल्याने जिल्हा परिषद (Collector Fined Palghar Zilla Parishad President) अध्यक्षा भारती कामडी यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. मास्क विसरल्याची कबुली अध्यक्षा कामडी यांनी दिल्यानंतर त्यांना दोनशे रुपयांचा दंड आकारुन मास्क देण्यात आला (Collector Fined Palghar Zilla Parishad President).
‘नो मास्क, नो एन्ट्री’
‘नो मास्क, नो एन्ट्री’ या राज्य सरकारच्या धोरणाचे उल्लंघन याअंतर्गत ही कारवाई केल्याने जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात सतर्कतेचे संकेत दिले आहेत. पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात एका विषयावर चर्चा करण्यासाठी अध्यक्षा भारती कामडी यांनी आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास प्रवेश घेतला.
200 रुपयाचा दंड
जिल्हाधिकारी यांच्या समोर बसल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडे मास्क नसल्याबाबत विचारणा केली. मात्र, आपण मास्क विसरल्याची कामडी यांनी प्रांजळपणे कबुली दिली. मास्क परिधान न करणे राज्य शासनाच्या धोरणानुसार गुन्हा असल्याने त्यांच्यावर 200 रुपयाची दंडात्मक कारवाई करुन त्यांना एक नवीन मास्क देण्यात आला (Collector Fined Palghar Zilla Parishad President).
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मास्क घालण्याबाबत सक्ती केली जात असून त्याचे अनुकरण जिल्ह्यात इतर ठिकाणी करण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात मास्क लावण्याबाबत बेफिकिरी दाखवणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहिम हाती घेण्यात येईल, असे संकेत पालघर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
नाहीतर ठेकेदाराला बघून घेतो, उपमुख्यमंत्री अजितदादांनी भरला दम! https://t.co/xg5YGGluf8 @AjitPawarSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks #ajitpawar #NCP #contractors
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 31, 2021
Collector Fined Palghar Zilla Parishad President
संबंधित बातम्या :
…आणि आदित्य बोलत असतानाच सेना आमदारानं मास्क चढवला!
… अन सेटवर रंगला मास्क-सॅनिटायझरचा खेळ
Cm Uddhav Thackeray Corona Vaccination | सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावरील मास्क : मुख्यमंत्री