अर्धसत्य कुणी सांगितलं मी पूर्णसत्य लवकरच सांगणार, सत्यजित तांबे यांचा रोख कुणावर ? मतदान केल्यानंतर सत्यजित तांबे काय म्हणाले…
जे सत्य आहे ते योग्य वेळ आली की सांगेल, त्यांनी अर्धसत्य सांगितलं मी लवकरच योग्य वेळ आली की पूर्णसत्य सांगेल. राजकारणाची योग्य वेळ कधीही येवू शकते असंही सत्यजित तांबे यांनी म्हंटले आहे.
मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, संगमनेर : लोकांनी प्रतिसाद दिलाय, त्यांच्या ऋणात राहने पसंत करेल. विजय झालाच आहे. फक्त किती लिड मिळत त्याकडे लक्ष आहे. लॉक पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जावून काम करत आहे याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. मी अपक्ष उमेदवार अपक्षच राहील. अर्धसत्य ठेवून बाजू मांडली आहे त्रास झाला आहे. मात्र, वेळ आली की बोलणार आहे. कॉग्रेसकडून अन्याय नाही झाला काही नेत्याकडून अन्याय झाला आहे असंही सत्यजित तांबे यांनी म्हंटलं आहे. बाळासाहेब थोरात हे आजारी आहे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे त्यांना हालचाल करता येत नाही. जी व्यक्ती दु:खातून जात आहे त्यामुळे त्यांना दु:ख देवूशी वाटत नाही असेही सत्यजित तांबे यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच निशाण साधला आहे.
माझी उमेदवारी ही कॉग्रेसची उमेदवारी आहे. माध्यमांनी चुकीची माहीती दिलीय. मी कॉग्रेस फॉर्म भरला मात्र तिन वाजेपर्यंत एबी फॉर्म भरू शकलो नाही त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
जे सत्य आहे ते योग्य वेळ आली की सांगेल, नाना पटोले यांनी अर्धसत्य सांगितलं मी लवकरच योग्य वेळ आली की पूर्णसत्य सांगेल. राजकारणाची योग्य वेळ कधीही येवू शकते असंही सत्यजित तांबे यांनी म्हंटले आहे.
सत्यजित तांबे यांनी दोन अर्ज भरले होते त्यामध्ये सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारीचा एक अर्ज आणि एक अर्ज एबी फॉर्म नसलेला पण कॉंग्रेसचे नाव टाकून एक अर्ज भरला होता.
त्यात भाजपने कुणालाही एबीफॉर्म दिला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा झाली होती, त्यानंतर सत्यजित तांबे यांनीही देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडे पाठिंबा मागेल अशी विनंती केली होती.
सत्यजित तांबे यांना स्थानिक पातळीवर म्हणजेच संगमनेर आणि नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यानं पाठिंबा दिला होता, त्यामध्ये सत्यजित तांबे यांचाच विजय होईल असेही विखे पाटील यांनी म्हंटलं होतं.
सुरुवातीपासून अत्यंत सावध प्रतिक्रिया आणि योग्य वेळ आली की बोलेन म्हणणारे सत्यजित तांबे यांनीही कॉंग्रेसच्या उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणी भाष्य केलं आहे. उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी कॉंग्रेसच्या एबीफॉर्मवर तांबे पिता-पुत्र बोलले होते.
त्यानंतर नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांनाही कोरा फॉर्म दिला होता असे म्हंटले होते त्यावर सत्यजित तांबे यांनी पूर्ण सांगितले तर चकित व्हाल असे म्हंटले आहे.