सत्तासंघर्षाची सुनावणी कुठपर्यंत आली? कळीचा मुद्दा कोणता जेष्ठ वकिल उज्ज्वल निकम म्हणताय…
जेष्ठ वकिल उज्ज्वल निकम म्हणाले, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटाचा युक्तिवाद पाहता दोन्ही गटाच्या वकिलांनी सगळ्याच मुद्द्यावर युक्तिवाद केला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा ( Supreme Court ) दूसरा दिवस पार पडला आहे. उद्या देखील सुनावणी होणार आहे. सुनावणी दरम्यान दोन्ही गटासह राज्यपाल यांच्यावतिने देखील बाजू मांडण्यात आली आहे. त्यावर जेष्ठ वकिल उज्ज्वल निकम ( Adv Ujjwal Nikam ) यांनी आपलं मत मांडलं आहे. सुनावणी दरम्यान आत्तापर्यंत झालेल्या सुनावणीचा अर्थ उलगडून सांगितला आहे. त्यामध्ये प्राथमिक मुद्दा कोणता राहू शकतो यावर देखील भाष्य केलं आहे. याशिवाय रेबिया प्रकरण विचारात घेण्याची शक्यता किती आहे. याचा देखील अंदाज मांडला आहे.
जेष्ठ वकिल उज्ज्वल निकम म्हणाले, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात कालपासून म्हणजेच दोन दिवस झाले सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटाचा युक्तिवाद पाहता दोन्ही गटाच्या वकिलांनी सगळ्याच मुद्द्यावर युक्तिवाद केला आहे.
विशेषतः राज्यपालांनी विशेष सत्र बोलण्याबद्दलचा निर्णय असेल, 16 आमदारांचची सुरत वारी, गुवाहाटीला जाऊन आले असतील त्या कृत्यामुळे ते स्वतःहून पक्षातून बाहेर पडले असेल, किंवा विधानसभा अध्यक्ष यांची निवड आणि त्यानंतर अपात्रतेची नोटिस असेल यावर युक्तिवाद झाला आहे.
या सुनावणीदरम्यान सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की, सोळा आमदार पात्र होतात की नाही आणि हे एक प्रकरण आहे. आणि विधानसभेच्या अध्यक्षांना अधिकार आहे की नाही ? आणि आमदारांना अविश्वास प्रस्ताव दाखल करता येतो की नाही? हे महत्वाचे मुद्दे आहेत.
उपाध्यक्ष झिरवाल यांनी पाठवलेली नोटिस ही देखील महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली आहे. मात्र, सर्वात पहिला आमदार अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालय हाती घेण्याची शक्यता निकम यांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय उज्ज्वल निकम यांनी तीन महत्वाचे मुद्दे मांडले आहे. ज्यावर पहिल्यांदा निर्णय होईल आणि मगच निकाल दिला जाईल. 16 आमदार अपात्र आहे की नाही, उपाध्यक्ष यांच्यावर ऑनलाईन पद्धतीने अविश्वास प्रस्ताव आणि 16 आमदारांना नोटिस पाठविने यावर सुरुवातीला निर्णय होईल.
त्यानंतर रेबिया केसचा निकाल आणि महाराष्ट्राचे प्रकरण एकदा तपासून घेतील आणि मग प्रकरण सात खंडपिठाकडे द्यायचे का ? याबाबत निर्णय होईल. आणि मगच निकाल लागेल असेही उज्ज्वल निकम यांनी म्हंटलं आहे.
सध्या तरी सात खंडपिठाकडे हा विषय जाणार नाही. पाच जणांच्या खंडपिठाकडे पूर्ण सुनावणी होईल. आणि मगच त्याबाबत निर्णय होईल. सर्व याचिका एकत्रित करून ही सुनावणी सुरू असल्याने प्राथमिक काय निर्णय होती हे बघावे लागेल असेही उज्ज्वल निकम यांनी म्हंटले आहे.