गुहागर : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. भाजपकडून शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे आक्रमक नेते आणि आमदार भास्कर जाधव(Shiv Sena leader Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात(Guhagar police station) तक्रार झाली आहे. भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
गुहागर मध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. देशात दंगली घडवण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केल असल्याचे गंभीर वक्तव्या भास्कर जाधव यांनी केले. महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात हिंदू मुस्लिम यांच्यात दंगल पेटवेल असेही ते म्हणाले होते.
भास्कर जाधव यांच्या या वक्तव्या नंतर गुहागर मधील भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पोलिसात तक्रार केलीय.भास्कर जाधव यांचे वक्तव्य निराधार आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला आहे. गुहागर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे आता भास्कर जाधव यांच्यावर कारवाई होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गुहागर मधील शिवसेना मेळाव्यात भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधताना अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले त्या राज्यांमध्ये निवडणुकीपूर्वी जातीय दंगली झालेल्या आहेत. या दंगली घडल्या आहेत किंवा जातीय दंगली घडवल्या आहेत असं म्हणत त्यांनी इतिहासाचा दाखला देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना संपवण्यासाठी शेवटचा मार्ग म्हणून राज्यात कदाचित जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी राज्यात जातीय दंगली घडवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याने भाजप या मार्गाने देखील जाऊन शकते असे गंभीर वक्तव्य जाधव यांनी केले होते.