Buldana : अपघातानंतर संतप्त महिलेने चालकाला चपलेने मारमार मारले; बुलडाण्यात नेमकं काय घडलं?
बुलडाण्यातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. सुंदरखेड जवळ भरधाव काँक्रेट मिक्सर उलटल्याने काँक्रेट मिक्सरच्या खाली दबून रस्त्याच्या कडेला पार्क केलेले चार दुचाकी वाहने चक्काचूर झाले.
बुलडाणा : बुलडाण्यातून (Buldana) एक विचित्र अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. सुंदरखेड जवळ भरधाव काँक्रेट मिक्सर (Concrete mixer) उलटल्याने काँक्रेट मिक्सरच्या खाली दबून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या चार दुचाकी वाहने चक्काचूर झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. मात्र वाहनाचा चालक आणि ऑपरेटर किरकोळ जखमी झाले. मात्र ज्या दुचाकींचा चुराडा झाला होता त्यापैकीच एका दुचाकी मालकाच्या आईने दुचाकीचे नुकसान झाल्याच्या रागातून मिक्सर चालकाला चपलेने चांगलाच चोप दिला या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वरवंड ते उन्द्री मार्गाचे काम बंद पडले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी पुन्हा या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याच कामासाठी काँक्रिट भरून काँक्रिट मिक्सर हे बुलडाण्यावरून वरवंडच्या दिशेने निघाले होते.
सुंदरखेडजवळ अचानक रस्त्यात वासरू आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मिक्सर रस्त्याच्या कडेला अचानक पलटी झाले. मात्र हे काँक्रिट मिक्सर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर पलटी झाले. या अपघातात चार दुचाक्यांचा चक्काचूर झाला.
चालकाला मारहाण
ही घटना जेव्हा घडली तेव्हा ज्या दुचाकींचं अपघातात नुकसान झालं आहे, त्यापैकीच एक असलेल्या दुचाकीच्या मालकाची आई तिथेच होती. दुचाकीचे झालेलं नुकसान पाहून महिलेचा संताप अनावर झाला. तीने चालकाला चपलेनं मारलं.
कुठलीही जीवितहानी नाही
सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. चालक आणि ऑपरेटर किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र हे काँक्रिट मिक्सर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर पलटी झाल्याने या अपघातात चार दुचाकींचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर दुचाकीचे नुकसान पाहून महिलेला संताप अनावर झाला आणि तिने संतापाच्या भरात चालकाला चपलेने चांगलेच मारले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Buldhana Accident | सुंदरखेड जवळ भरधाव काँक्रेट मिक्सर पलटी – tv9#Buldhana #Accident #BeatenByWoman #Concrete mixer
अधिक माहितीसाठी पाहा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/2jGpa2PWi8
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2022