मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावरुन भाजप कार्यकर्ते आणि अब्दुल सत्तार यांच्यात जुंपली
अब्दुल सत्तार (Sillod Abdul sattar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे, तर भाजप कार्यकर्त्यांनी या स्वागताला जोरदार विरोध केलाय. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अब्दुल सत्तार यांनी मंच उभारत सिल्लोड शहरभर फलक लावले आहेत.
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सिल्लोडमध्ये दाखल होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसचा राजीनामा दिलेले अब्दुल सत्तार (Sillod Abdul sattar) यांच्यात जुंपली आहे. अब्दुल सत्तार (Sillod Abdul sattar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे, तर भाजप कार्यकर्त्यांनी या स्वागताला जोरदार विरोध केलाय. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अब्दुल सत्तार यांनी मंच उभारत सिल्लोड शहरभर फलक लावले आहेत.
सिल्लोड हा अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे स्थानिक राजकारण पेटलंय. महाजनादेश यात्रा बुधवारी सकाळी 11 वाजता सिल्लोडमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे भाजप प्रवेशासाठी इच्छुक असलेले अब्दुल सत्तारही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहेत. यासाठी त्यांनी जय्यत तयारीही केली. पण त्याअगोदरच वाद पेटला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसने चुकीचा उमेदवार दिला असं म्हणत पक्ष सोडला होता. यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली. पण स्थानिक राजकारणात त्यांचं भाजपशी सख्य नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सिल्लोड दौऱ्यातच सत्तार भाजपात प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात होतं.