Video | काँग्रेसचे घडीभराचे टशन खत्म; अन् ‘सागर’मध्ये हास्य, विनोद, गप्पांची मैफल सुरू…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले. याविरोधात पहिली तोफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डागली. पंतप्रधानांना अतिशय सभ्य भाषेत त्यांच्या पदाची जाणीव करून देत आपले हे बोलणे योग्य नव्हे, हे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

Video | काँग्रेसचे घडीभराचे टशन खत्म; अन् 'सागर'मध्ये हास्य, विनोद, गप्पांची मैफल सुरू...!
काँग्रेसचे आंदोलन संपल्यानंतर सागर बंगल्यात भाजप नेत्यांची गप्पांची मैफल रंगली.
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 3:35 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी पंतप्रधानांनी माफी मागावी मागावी म्हणून या आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, काँग्रेसने दुपारी हे हे आंदोलन थांबवले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात भाजप नेत्यांची गप्पांची मैफल रंगली. हास्य, विनोद आणि किश्शांना उधाण आले. यावेळी आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह आदी नेते मंडळी उपस्थित होते. या आंदोलनाच्या काळात इकडे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावली.

कशासाठी आंदोलन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले. याविरोधात पहिली तोफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डागली. पंतप्रधानांना अतिशय सभ्य भाषेत त्यांच्या पदाची जाणीव करून देत आपले हे बोलणे योग्य नव्हे, हे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले. सोबत काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी लावून धरली होती. मोदींविरोधात सातत्याने प्रक्षोभक वक्तव्य करणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले.

लोढेंची घोषणाबाजी

तत्पू्र्वी सकाळीच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे एकटेच सागर निवासस्थानी गेले. त्यांनी सागर बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा महाराष्ट्रद्रोही बीजेपीचा निषेध असो, अशा घोषणा लोंढे यांनी दिल्या. त्यावेळी अरे या, गाडी घे ना, असे म्हणत पोलिसांनी लोंढेंच्या खरोखरच मुसक्या आवळल्या. लोंढेंचे दोन्ही हात पाठी पकडून पोलिसांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला होता. त्या अवस्थेतही लोंढे घोषणा देत होते. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीत बसवले आणि पोलीस स्टेशनकडे नेले.

अन् हास्य विनोद…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा दुपारी आंदोलनासाठी आले. मात्र, त्यांना पोलिसांनी इथे आंदोलन करू नका. आझाद मैदानावर करा, अशा सूचना केल्या. त्यामुळे काँग्रेसने हे आंदोलन शेवटी रहीत केले. ही बातमी सागर बंगल्यात पोहचली. तेव्हा इतक्यावेळ थोडे टेन्शनमध्ये असणाऱ्या भाजप नेत्यांच्या गप्पांची बैठक रंगली. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झालेले देवेंद्र फडणवीसही बैठकीत दाखल झाले. तेव्हा आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांच्यात हास्य विनोद सुरू झाले. तासाभराचे टेन्शन अचानक संपले.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.