“बाबासाहेबांना भारतरत्न देतानाही काँग्रेसने दुजाभाव केला”; प्रकाश आंबेडकरांना भाजप नेत्यानं ‘या’ गोष्टींची करुन दिली आठवण…
वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत आघाडी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काँग्रेस विरोधाची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
चंद्रपूरः प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या आघाडीच्या चर्चा सुरू झाल्यापासून भाजपकडून वारंवार प्रकाश आंबेडकर यांना आघाडीबाबत सल्ला दिला जात आहे. त्यातच नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यावरूनही उलटसुलट चर्चा चालू झाल्या होत्या. त्यानंतर भाजपकडूनही प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसची आघाडी होत असल्याच्या गोष्टीवर भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसने त्यांच्यावर केलेली अन्यायकारक राजकारण याचीही आठवण त्यांना करून दिली आहे.
त्यामुळे आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करतान विचारपूर्वक निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
याविषयी बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काँग्रेस विरोधाची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी.
कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे राजकीय नेतृत्व करण्याची कुवत असतानाही त्याकाळात काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला असल्याची टीका त्यांनी केली आहे.
तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आंबेडकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, बाबासाहेबांना भारतरत्न देतानादेखील काँग्रेसने दुजाभाव केला आहे.
तर भंडारा लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी स्वतः पंडित नेहरू मैदानात उतरले होती या गोष्टीची त्यांनी त्यांना आठवणही करुन दिली आहे.
बाबासाहेबांना संसदेतदेखील जाऊ न देणाऱ्या काँग्रेसबाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत आघाडी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काँग्रेस विरोधाची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
बाबासाहेब यांना भारतरत्न देतानादेखील काँग्रेसने दुजाभाव केला होता याचीही त्यांनी आठवण करुन दिली आहे. या अशा विविध घटनांबाबत काँग्रेसकडून वारंवार बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काँग्रेसकडून अन्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी करताना विचारपूर्वक करावी आणि निर्णय घ्यावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.