Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

आसिफ शेख रशीद यांना आम्ही मालेगावच्या विकासासाठी संपूर्ण ताकद देऊ आणि त्यांच्या पाठीमागे पार्टी देखील उभी राहील, असे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले. | Asif Shaikh NCP

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
गेल्याच महिन्यात आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 2:31 PM

मुंबई: मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख रशीद (Asif Shaikh) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाात उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. (Congress Ex MLA Asif Shaikh Join NCP)

आसिफ शेख रशीद यांना आम्ही मालेगावच्या विकासासाठी संपूर्ण ताकद देऊ आणि त्यांच्या पाठीमागे पार्टी देखील उभी राहील, असे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले. आसिफ शेख रशीद यांच्यासह 15 माजी नगरसेवकांनी देखील पार्टीमध्ये प्रवेश केला. कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रदेश कार्यालयात काही मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्याच महिन्यात आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून ते कोणत्या राजकीय पक्षात जाणार, याची चर्चा सुरु होती.

आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक

आसिफ शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मालेगावातील राजकीय परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहे. मालेगाव महापालिकेत ही काँग्रेस- शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी मात्र विरोधात आहे

“गेल्या वीस वर्षापासून मी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. प्रामाणिकपणे काम करताना मालेगावातील जनतेची सेवा केली. माझ्या वैयक्तिक कारणासाठी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करुन पुढील दिशा ठरविली जाईल. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या निर्णयावरच अवलंबून असेल. 15 दिवसानंतर अंतिम निर्णय घेऊ” असे आसिफ शेख काँग्रेसला दिलेल्या राजीनाम्यानंतर म्हणाले होते.

आसिफ शेख यांचा अल्पपरिचय

1. मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. 2. आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक आहेत. 3. आसिफ शेख यांनी 1998 मध्ये यूथ काँग्रेसचे सचिव पद भूषवले आहे. 4. आसिफ शेख हे 2002 ते 2012 पर्यंत काँग्रेसचे नगरसेवक 5. 2005 ते 2007 या कालावधीत ते महापौर झाले. 6. 2007 ते 2012 पर्यंत त्यांनी महापालिकेत गटनेता म्हणून काम पाहिले. 7. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. 8. 2019 च्या निवडणुकीत त्यांचा एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून पराभव झाला.

(Congress Ex MLA Asif Shaikh Join NCP)

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.