नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर काँग्रेस हायकंमाडचा मोठा निर्णय, पराभवाबद्दलही वक्तव्य

नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता यावर काँग्रेस हायकंमाडने मोठा निर्णय घेतला आहे.

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर काँग्रेस हायकंमाडचा मोठा निर्णय, पराभवाबद्दलही वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 11:19 AM

Nana Patole Resignation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकासआघाडीचा सुपडासाफ झाला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता यावर काँग्रेस हायकंमाडने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचा गडबड सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना पटोले यांनी पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र नाना पटोले यांचा राजीनामा अद्याप काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाही. त्यामुळे नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते.

“आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल”

आता काँग्रेस हायकमांडकडून नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. “ही राजीनामा देण्याची वेळ नाही. हा फक्त प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा नाही. हा निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचाही मुद्दा आहे. त्यामुळे आता तुम्ही राजीनामा देऊन मीडियासमोर चुकीचा नरेटिव्ह सेट करु नका. हायकंमाडच्या निर्णयाची प्रतीक्षा करा. प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहा. विधानसभेच्या पराभवाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल”, असे काँग्रेस हायकमांडने सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम

तसेच काल काँग्रेसच्या मीडिया सेलने नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळून लावलं होतं. ‘नाना पटोलेंनी राजीनामा दिलेला नाही. यासंदर्भातल्या बातम्या असत्य असून त्या खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत’, असे काँग्रेसच्या मिडिया सेलकडून सांगण्यात आले होते. त्यातच आता काँग्रेस हायकमांडने दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय होईपर्यंत नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

महायुतीला स्पष्ट बहुमत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.