Rahul Gandhi : हरभऱ्याची भाजी, वांगी आणि तूर डाळ… राहुल गांधींनी स्वत: बनवला मराठमोळा स्वयंपाक; थेट ‘दलित किचन’मध्ये
गेल्या आठवड्यात राहुल गांधी हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी एका दलित कुटुंबाची भेट घेतली. एवढंच नव्हे तर त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन, त्यांच्यासोबत स्वयंपाकही बनवला. राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केलाय.
विधानसभा निवडणुका तोंडावर येताच देशातील मोठमोठ्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात ( शनिवार 5 ऑक्टोबर) तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी दोघेही महाराष्ट्रात आले होते. जवळपास 14 वर्षांनी राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी एका दलित कुटुंबाची भेट घेतली. अनौपचारिक अशा या भेटीवेळी त्यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या. एवढंच नव्हे तर राहुल यांनी त्यांच्या किचनमध्ये जाऊन स्वयंपाकही केला. जातपात, भेदभावाच्या विषयावर त्यांच्याशी चर्चाही केली.
अजय तुकाराम सनदे , अंजना तुकाराम सनदे यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. आजच्या काळातही असे खूप कमी लोक आहेत ज्यांना दलितांच्या किचनबद्दल माहिती असेल. यासंदर्भातील ट्विट करताना राहुल गांधी यांनी एक ओळही लिहीली. शाहू पाटोळे यांनी म्हटल्याप्रमाणे, “दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही.”
दलित नागरिक काय खातात, अन्न कसं शिजवतात, त्याचं सामाजिक आणि राजकीयय महत्व का आहे, याच जिज्ञासेपोटो, उत्सुकतेपोटी मी अजय तुकाराम सनदे आणि अंजना सनदे यांच्यासोबत त्यांच्या घरी एक दुपार घालवली. कोल्हापूरमधल्या घरात मला आदराने बोलावून, त्यांच्या स्वयंपाक घरात अन्न शिजवण्याची, मदत करण्याची संधी त्यांनी मला दिली, असे राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं. आम्ही सर्वांनी मिळून हरभऱ्याची भाजी, वांगं घालून तुरीची डाळ, असे पदार्थ शिजवल्याचेही त्यांनी लिहीलं.
दलित किचन के बारे में आज भी बहुत कम लोग जानते हैं। जैसा शाहू पटोले जी ने कहा, “दलित क्या खाते हैं, कोई नहीं जानता।”
वो क्या खाते हैं, कैसे पकाते हैं, और इसका सामाजिक और राजनीतिक महत्व क्या है, इस जिज्ञासा के साथ, मैंने अजय तुकाराम सनदे जी और अंजना तुकाराम सनदे जी के साथ एक दोपहर… pic.twitter.com/yPjXUQt9te
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2024
जातपात, भेदभावाच्या मुद्यावर राहुल यांनी केली चर्चा
पाटोळे जी आणि सनदे जी यांच्याशी, त्यांच्या कुटुंबियांशी जातपात, भेदभावाच्या अनुभवाबद्दल आम्ही बोललो. दलितांच्या आहाराबद्दल (पुरेशी) जागरूकता नसणे आणि या संस्कृतीच्या डॉक्यूमेंटेशनचे महत्व या विषयावर चर्चा केली. संविधानाने बहुजनांना (त्यांचा) वाटा आणि अधिकार दिला आहे. आणि त्या संविधानाचे आम्ही रक्षण करू . पण जेव्हा प्रत्येक भारतीय व्यक्ती मनात बंधुभाव ठेवून प्रयत्न करेल तेव्हाचा समजात खरी सर्वसमावेशकता आणि समानता शक्य होईल, असे राहुल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.
राहुल गांधी यांनी शनिवारी कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच त्यांनी संविधान संमेलनात सहभाग घेऊन उपस्थितांना संबोधितही केलं